गणपतीच्या विसर्जनासाठी जळगावला प्रथमच ‘रॅपीड अॅक्शन फोर्स’ तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 01:01 PM2019-09-10T13:01:40+5:302019-09-10T13:03:09+5:30
गणेशोत्सवात यंदा प्रथमच ‘रॅपीड अॅक्शन फोर्स’ मागविण्यात आला असून हा फोर्स विसर्जनाच्या दिवशी शहर व अतिसंवेदनशील भागात बंदोबस्तावर असणार आहे.
जळगाव: गणेशोत्सवात यंदा प्रथमच ‘रॅपीड अॅक्शन फोर्स’ मागविण्यात आला असून हा फोर्स विसर्जनाच्या दिवशी शहर व अतिसंवेदनशील भागात बंदोबस्तावर असणार आहे. दरम्यान, शहरातील विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. अखेरच्या दिवशी १ हजार ५२९ मंडळाकडून जिल्ह्यात ‘श्री’ चे विसर्जन केले जाणार आहे. त्यात १०५ ‘एक गाव एक गणपती’ चा समावेश आहे.
तसेच यंदा जिल्ह्यात २ हजार ३२१ मंडळाकडून ‘श्री’ची स्थापना झाली असून १४१ गावात ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. १ हजार ७०२ ठिकाणी सार्वजनिक तर ४७८ ठिकाणी खासगी मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. कुठेही अनुसचित प्रकार घडू नये यासाठी प्रथमच विसर्जनाला ‘रॅपीड अॅक्शन फोर्स’ मागविण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली.
गणेशोत्सव शांततेत पार पडावा, या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी मुंबई येथून रॅपीड अॅक्शन फोर्स मागविण्यात आला असून त्यात १२० सशस्त्र कर्मचारी आहेत. त्याशिवाय पोलीस प्रशिक्षण केंद्रातील २५ उपनिरीक्षक जालना व धुळे येथून स्वतंत्र २०० जणांचे रिक्रुड (पथक) मागविण्यात आले आहे. दरम्यान, विसर्जन मार्गावर ५२ ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
असे आहेत अखेरच्या दिवशी विसर्जनाचे मंडळ
- एकुण मंडळ : १५२९
- सार्वजनिक :११५४
- खासगी : ३७५
- एक गाव एक गणपती : १०५
असा राहिल बंदोबस्त
- पोलीस अधीक्षक : १
- अपर पोलीस अधीक्षक : २
- उपअधीक्षक : १०
- पोलीस निरीक्षक : ३२
- वायरलेस निरीक्षक : २
- सहायक /उपनिरीक्षक : ९०
- परिविक्षाधीन उपनिरीक्षक : २०
- सीआयडी निरीक्षक (पुणे) ५
- नवप्रविष्ठ शिपाई : २००
- कर्मचारी : २६००
- आरसीपी प्लाटून : ८ (एका प्लाटूनमध्ये २९ कर्मचारी)
- एसआरपी कंपनी : १ (१२० कर्मचारी)
- होमगार्ड : १८००
- एसआरपीएफ कंपनी : १ (अमरावती)
- आरसीपी प्लाटून : ८
- स्ट्रायकिंग फोर्स : १६ प्लाटून
- क्युआरटी पथक : १
- रॅपीड अॅक्शन फोर्स : १२० कर्मचारी