विसर्जनासाठी जळगावला प्रथमच मागविला ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:38 PM2019-09-10T12:38:08+5:302019-09-10T12:41:54+5:30

गणेशोत्सवात यंदा प्रथमच ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’ मागविण्यात आला असून हा फोर्स विसर्जनाच्या दिवशी शहर व अतिसंवेदनशील भागात बंदोबस्तावर असणार आहे. दरम्यान, शहरातील विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. अखेरच्या दिवशी १ हजार ५२९ मंडळाकडून जिल्ह्यात ‘श्री’ चे विसर्जन केले जाणार आहे. त्यात १०५ ‘एक गाव एक गणपती’ चा समावेश आहे.

Jalgaon calls for 'immersion action force' for immersion first | विसर्जनासाठी जळगावला प्रथमच मागविला ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’

विसर्जनासाठी जळगावला प्रथमच मागविला ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’

Next
ठळक मुद्देविसर्जन मार्गावर सीसीटीव्हीची नजर अखेरच्या दिवशी १५२९ मंडळाकडून विसर्जन
ref='https://www.lokmat.com/topics/jalgaon/'>जळगाव : गणेशोत्सवात यंदा प्रथमच ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’ मागविण्यात आला असून हा फोर्स विसर्जनाच्या दिवशी शहर व अतिसंवेदनशील भागात बंदोबस्तावर असणार आहे. दरम्यान, शहरातील विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. अखेरच्या दिवशी १ हजार ५२९ मंडळाकडून जिल्ह्यात ‘श्री’ चे विसर्जन केले जाणार आहे. त्यात १०५ ‘एक गाव एक गणपती’ चा समावेश आहे. यंदा जिल्ह्यात २ हजार ३२१ मंडळाकडून ‘श्री’ची स्थापना झाली असून १४१ गावात ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. १ हजार ७०२ ठिकाणी सार्वजनिक तर ४७८ ठिकाणी खासगी मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. कुठेही अनुसचित प्रकार घडू नये यासाठी प्रथमच विसर्जनाला ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’ मागविण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली.मुंबई येथून मागविला फोर्सगणेशोत्सव शांततेत पार पडावा, या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी मुंबई येथून रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स मागविण्यात आला असून त्यात १२० सशस्त्र कर्मचारी आहेत. त्याशिवाय पोलीस प्रशिक्षण केंद्रातील २५ उपनिरीक्षक जालना व धुळे येथून स्वतंत्र २०० जणांचे रिक्रुड (पथक) मागविण्यात आले आहे. दरम्यान, विसर्जन मार्गावर ५२ ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. असे आहेत अखेरच्या दिवशी विसर्जनाचे मंडळ एकुण मंडळ : १५२९सार्वजनिक :११५४खासगी : ३७५एक गाव एक गणपती : १०५ असा राहिल बंदोबस्त पोलीस अधीक्षक : १अपर पोलीस अधीक्षक : २उपअधीक्षक : १०पोलीस निरीक्षक : ३२वायरलेस निरीक्षक : २सहायक /उपनिरीक्षक : ९०परिविक्षाधीन उपनिरीक्षक : २०सीआयडी निरीक्षक (पुणे) ५नवप्रविष्ठ शिपाई : २००कर्मचारी : २६००आरसीपी प्लाटून : ८ (एका प्लाटूनमध्ये २९ कर्मचारी)एसआरपी कंपनी : १ (१२० कर्मचारी)होमगार्ड : १८००एसआरपीएफ कंपनी : १ (अमरावती)आरसीपी प्लाटून : ८स्ट्रायकिंग फोर्स : १६ प्लाटूनक्युआरटी पथक : १ रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स : १२० कर्मचारी

Web Title: Jalgaon calls for 'immersion action force' for immersion first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.