"जळगावातील ‘त्या’ कुटुंबांना केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण मदत करणार", पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आश्वासन
By अमित महाबळ | Updated: August 25, 2024 14:28 IST2024-08-25T14:00:36+5:302024-08-25T14:28:56+5:30
Jalgaon News: नेपाळमधील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या कुटुबांना केंद्र व राज्य सरकार पूर्ण मदत करेल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धीर दिला आहे. ते रविवारी, जळगावमध्ये लखपती दिदी मेळाव्यात बोलत होते.

"जळगावातील ‘त्या’ कुटुंबांना केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण मदत करणार", पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आश्वासन
- अमित महाबळ
जळगाव - नेपाळमधील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या कुटुबांना केंद्र व राज्य सरकार पूर्ण मदत करेल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धीर दिला आहे. ते रविवारी, जळगावमध्ये लखपती दिदी मेळाव्यात बोलत होते.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. नेपाळ दुर्घटनेतील पीडित कुटुंबांच्या प्रती संवेदना व्यक्त केली. घटनेनंतर भारत सरकारने त्वरित नेपाळ सरकारशी संपर्क साधला. मंत्री रक्षा खडसे यांना नेपाळला जायला सांगितले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचे पार्थिव विमानाने जळगावला आणण्याची व्यवस्था केली, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
नेपाळ घटनेतील जखमींवर उपचार सुरू आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो, असेही मोदी म्हणाले. घटनेतील पीडित कुटुंबांना केंद्र व राज्य सरकार पूर्णपणे मदत करेल, अशा शब्दात त्यांनी धीर दिला.