जळगाव सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांची १० महिन्यातच बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:26 PM2018-02-28T22:26:05+5:302018-02-28T22:26:05+5:30

नवे अधिकारी म्हणून एस. के. दिवेकर यांची नियुक्ती

Jalgaon CEO Kaustubh Davegaonkar shifted in 10 months | जळगाव सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांची १० महिन्यातच बदली

जळगाव सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांची १० महिन्यातच बदली

Next
ठळक मुद्देकौस्तुभ दिवेगावकर यांची अवघ्या १० महिन्यात बदलीएस. के. दिवेकर असतील जळगावचे नवीन सीईओकौस्तुभ दिवेगावकर यांच्या बदलीसाठी राजकीय दबाव आल्याची चर्चा

आॅनलाईन लोकमत
जामनेर, दि. २८ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कौस्तुभ दिवेगावकर यांची पुणे येथे बदली झाली असून त्यांच्या जागी मुंबई येथून एस. के. दिवेकर हे नवे सीईओ असतील. दिवेगावकर यांची अवघ्या १० महिन्यात बदली झाल्याने या बदलीमागे ‘राजकारण’ असल्याची चर्चा आहे.
बदलीचे हे आदेश मंत्रालयातील सामान्य प्रभासन विभागातील अपर आयुक्त (सेवा) मुकेश खुल्लर यांनी २८ रोजी काढले. यानुसार दिवेगावकर यांची बदली पुणे महानगर पालिकेत अतिरीक्त आयुक्त या रिक्त पदावर झाली आहे. तर मुंबई येथील महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिवेकर यांची बदली दिवेगावकर यांच्या जागी जळगाव जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तात्पुरत्या स्वरुपात आहे.
कौस्तुभ दिवेगावकर यांंनी २० एप्रिल २०१७ मध्ये जळगाव जि.प.त पदभार स्विकारला होता. त्यांनी कर्मचाºयांना शिस्त लावण्याच्या दृष्टीने अचानक हजेरी तपासणी, दप्तर तपासणी करुन काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई देखील केली आहे. शाळांसाठी डिजीटल अभ्यासक्रम, पदोन्नत्यांची रखडलेली प्रक्रिया, झिरो पेंन्डसी, फाईल ट्रॅकिंग पद्धती ही कार्यपद्धती आदर्श उदाहरण असल्याचेच बोलले जात असे. याचबरोबर पोषण आहार घोटाळा, अपंग युनिट बोगस नियुक्त्या प्रकरण आदीमध्ये पुढाकार घेऊन त्यांनी कारवाई केली. तर पोषण आहार प्रकरण विधीमंडळातही गाजले आहे. ही कारवाई अनेकांना त्रासदायक ठरली. दरम्यान कामे होत नाही तसेच वेळ देत नाही, असे आरोप करीत पदाधिकाºयांंनी दिवेगाकर यांच्यावर जाहीर नाराजी देखील दर्शवली होती. या कारणांमुळेच त्यांच्या बदलीसाठी राजकीय दबाव आल्याची चर्चा आहे.

Web Title: Jalgaon CEO Kaustubh Davegaonkar shifted in 10 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.