जळगावातून चंद्रपूरला जाणारी बनावट दारु पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:04 PM2018-08-24T12:04:25+5:302018-08-24T12:05:43+5:30

राज्य उत्पादन शुल्कची रेल्वे स्टेशनवर कारवाई

From the Jalgaon to the Chandrapur the fake drunk caught | जळगावातून चंद्रपूरला जाणारी बनावट दारु पकडली

जळगावातून चंद्रपूरला जाणारी बनावट दारु पकडली

Next
ठळक मुद्देनवजीवन एक्सप्रेसमधून रवाना होणार होती दारुमुख्य सूत्रधार वेगळेच

जळगाव : नवजीवन एक्सप्रेसमधून जळगावहून चंद्रपूरला नेण्यात येणारा लाखो रुपयाचा बनावट देशी, विदेशी दारुचा साठा गुरुवारी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर पकडला. यावेळी राहूल सावन बागडे (वय २९, रा. नाथवाडा, जळगाव) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई करताना रेल्वे सुरक्षा बलाची मदत घेण्यात आली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव रेल्वे स्टेशनवरुन नवजीवन एक्सप्रेसमधून चंद्रपूर व बल्लाळशा येथे बनावट देशी व विदेशी दारुचा साठा जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुरनाड चेकपोस्टचे कॉन्स्टेबल अजय गावंडे यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच ही माहिती अधीक्षक एस.एल.आढाव यांना दिली. गावंडे भुसावळ येथून थेट रेल्वे स्टेशनला पोहचले तर जळगाव येथून आढाव यांचे पथकही साध्या गणवेशात पोहचले. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक महेंद्र पाल यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेतले. संशयावरुन बॅगांची तपासणी करीत असतानाच एका बॅगेत व गोणपाटात देशी दारुचा साठा आढळला. एकापाठोपाठ अशा दहा ते पंधरा बॅगा दारुने भरलेल्या आढळून आल्या.
अमळनेर येथेही पकडली दारु
अमळनेर येथे हॉटेल चिन्मय सर्व गार्डन येथे एका कारमध्ये (क्र. एम.एच.१९ क्यु.०१४०) या कारमध्ये दहा हजार रुपये किमतीची विदेशी दारु पकडण्यात आली. कारसह ३८ हजार ३३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. श्यामकांत देविदास बागुल याला अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक व्ही.एम.माळी व एम.बी. सोनार यांनी ही कारवाई केली.
या पथकाने केली कारवाई
राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक एस. एल.आढाव, निरीक्षक एन.बी. दहिवडे, दुय्यम निरीक्षक एम.बी.सोनार, जे.एस.मानमोडे, कॉन्स्टेबल अजय गावंडे, एस.एस.निकम, सागर देशमुख, रघुनाथ सोनवणे, डी.बी.पाटील, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक महेंद्र पाल, उपनिरीक्षक ओ.पी.कुलदीप सहायक उपनिरीक्षक वाय.के.शर्मा, आर.एन. पाटील, प्रमोद सांगळे व विक्रम वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
...तर कारवाई टळली असती
नवजीवन एक्सप्रेसची जळगाव स्थानकावर येण्याची वेळ सायंकाळी ४.५५ ची आहे. ४.४५ वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक रेल्वे स्टेशनवर पोहचले. विशेष म्हणजे गुरुवारी ही गाडी निर्धारित वेळेवर होती. दहा मिनिटे पथक उशिरा पोहचले असते तर कदाचित हा दारुचा साठा या एक्सप्रेसमधून रवाना झाला असता व कारवाई टळली असती.
मुख्य सूत्रधार वेगळेच..
या दारुच्या साठ्याजवळून पळून जाण्याची तयारी करीत असताना राहूल बागडे याला पथकाने पकडले. त्याची जागेवरच चौकशी केली असता हा दारुचा साठा चंद्रपुर व बल्लाळशा येथे जात असल्याचे त्याने सांगितले. मी फक्त रोंजदारीने नेणारा आहे, मुख्य सूत्रधार दुसरेच असल्याचे त्याने सांगितले. पथकाने त्याला अटक केलेली आहे. प्राथमिक चौकशीत ही दारु बनावट आढळून आली असून ती कोठून आणली व कोणी आणली याची चौकशी केली जात आहे. रेल्वे स्टेशनवर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईबाबत लोहमार्ग पोलिसांना विचारले असता आमच्यापर्यंत कोणतीच माहिती अद्याप आलेली नसल्याचे उत्तर चौकीतील कर्मचाºयांनी दिले.

प्राथमिक तपासणीत ही दारु बनावट दिसून येत आहे. तरीही मुंबई व नाशिक येथील प्रयोगशाळेत दारुचे नमुने पाठविले जातील. ही दारु कुठे तयार झाली. त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याची चौकशी केली जात आहे.
-एस.एल.आढाव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभाग

Web Title: From the Jalgaon to the Chandrapur the fake drunk caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.