जळगाव शहरात १४ नवे बाधित, ५९ रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:13 AM2021-06-06T04:13:51+5:302021-06-06T04:13:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरेानाचे १४ नवे बाधित आढळून आले असून, ५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरेानाचे १४ नवे बाधित आढळून आले असून, ५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मृतांची संख्याही घटली असून, सलग तीन दिवस शहरात एकही मृत्यू नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय सक्रिय रुग्णांची संख्या २८७ वर पोहोचली आहे. जळगाव ग्रामीणमध्ये १४ बाधित आढळून आले आहेत.
जिल्हाभरातच कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला असून, आता दैनंदिन पॉझिटिव्हिटी ही दोन टक्क्यांच्या खाली गेली आहे. याचा अर्थ दर शंभर अहवालांमध्ये एक ते दोन रुग्ण बाधित आढळून येत आहे. मध्यंतरी हे प्रमाण केवळ शहरात शंभर अहवालांमध्ये ४५ रुग्णांवर आले होते. शहरासह जिल्हाभरातच कोरोनाची स्थिती सुधारत असून, अनेक रुग्णालये बंददेखील झाली आहेत. मृतांमध्ये पारोळा ७२ वर्षीय महिला, तसेच रावेर तालुक्यातील ६६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे स्थिती
ऑक्सिजनवरील रुग्ण : ४३०
आयसीयूतील रुग्ण : १९४
लक्षणे असलेले रुग्ण ३४१५