जळगाव शहरात पोलीस कारवाईच्या भीतीने सुसाट दुचाकी आदळली दुभाजकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:57 PM2018-03-29T15:57:57+5:302018-03-29T15:57:57+5:30

पोलीस कारवाई करतील या भीतीने रस्ता चुकविण्याच्या नादात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून दोन सख्खे भाऊ व त्यांचा मित्र असे तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी बारा वाजता काव्यरत्नावली चौकात घडली. 

In Jalgaon city, due to police action, the helpless bike was attacked | जळगाव शहरात पोलीस कारवाईच्या भीतीने सुसाट दुचाकी आदळली दुभाजकावर

जळगाव शहरात पोलीस कारवाईच्या भीतीने सुसाट दुचाकी आदळली दुभाजकावर

Next
ठळक मुद्दे काव्यरत्नावली चौकात अपघात  दोन भाऊ व एक मित्र जखमी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची तयारी

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२९ : पोलीस कारवाई करतील या भीतीने रस्ता चुकविण्याच्या नादात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून दोन सख्खे भाऊ व त्यांचा मित्र असे तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी बारा वाजता काव्यरत्नावली चौकात घडली. 
परपत पुखराज टाक (वय १७ रा.निमखेडी, ता.जळगाव), मिहीर संतोष तायडे (वय १७) व जतीन संतोष तायडे (वय १५)  दोन्ही रा.पुष्पांजली पार्क, शिवाजी नगर, जळगाव असे जखमींची नावे आहेत. टाक याला जिल्हा रुग्णालयात तर मिहीर व जतीन या दोन्ही भावांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नरपत, मिहीर व जतीन असे तिघं जण एकाच दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.सी.५५९६) मेहरुण उद्यानाजवळील जलतरण तलावात स्वीमिंगसाठी गेले होते. तेथून परत घरी जात असताना काव्यरत्नावली चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. वाहन चालविण्याचा परवाना नाही, शिवाय आपण एकाच दुचाकीवर तीन जण असल्याने पोलीस अडवून कारवाई करतील अशी भीती या तिघांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे सुसाट वेगाने आलेल्या या तिघांची दुचाकी रस्ता चुकविताना भाऊंच्या उद्यानासमोरील दुभाजकावर आदळली. 
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची तयारी
काव्यरत्नावली चौकात शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होत असल्याने प्रशासनाच्यावतीने तेथे तयारी सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी पोलिसांचीही रंगीत तालिम सुरु असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची मोठी गर्दी या ठिकाणी होती.

Web Title: In Jalgaon city, due to police action, the helpless bike was attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.