जळगाव शहरात गॅस सिलिंडरच्या स्फोटात १० कुटुंबाचा संसार खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:20 PM2018-03-13T13:20:58+5:302018-03-13T13:20:58+5:30
शिवाजी नगरातील भुरे मामलेदार प्लॉट भागात मंगळवारी सकाळी १० वाजता चेतन भगत यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत क्षणार्धात पार्टीशेनची १० घरे खाक झाली. अग्नितांडव व स्फोटाच्या आवाजामुळे सर्वत्र पळापळ झाली. दोन घरात असलेल्या महिला या लहान मुलांना घेऊन जीव वाचविण्यासाठी पळत सुटल्या. यावेळी दीड तास अग्नितांडव सुरु होते.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, १३ : शिवाजी नगरातील भुरे मामलेदार प्लॉट भागात मंगळवारी सकाळी १० वाजता चेतन भगत यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत क्षणार्धात पार्टीशेनची १० घरे खाक झाली. अग्नितांडव व स्फोटाच्या आवाजामुळे सर्वत्र पळापळ झाली. दोन घरात असलेल्या महिला या लहान मुलांना घेऊन जीव वाचविण्यासाठी पळत सुटल्या. यावेळी दीड तास अग्नितांडव सुरु होते.
शिवाजी नगरातील भुरे मामलेदार प्लॉट भागात सतीश प्रतापराव कंडारे यांनी पार्टीशनचे १२ घरे बांधली आहेत. त्यात हमाली करणारे १० कुटुंब भाड्याने राहतात. मंगळवारी सर्वच कुटुंब सकाळी कामाला गेल्याने घरी कोणीच नव्हते. चेतन सोनार यांच्या घरात अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात आग लागल्याने पार्टीशनची घरे जळून खाक झाली. पाण्याने विझविण्यासाठी वेळ मिळाला नाही. महापालिकेच्या गोलाणी मार्केट व गेंदालाल मील भागातील अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने मागविण्यात आले. दीड तासाच्या मेहनतीनंतर आग पुर्णपणे विझविण्यात आली.
यांच्या घरांचा झाला कोळसा
या दुर्घटनेत चेतन भगत, रोहीणी सोनार, मंगला सोनार, रफिक शेख, शारदा विनोद मिसाळे, ज्ञानेश्वर पाटील, संजय मिस्तरी, विष्णू कोळी, ज्ञानेश्वर शिंपी व नरेश बाविस्कर या दहा जणांच्या घराचा कोळसा झाला आहे.