जळगाव शहरात गणरायाचे दर्शन घेऊन परतणा-या भाविकांची रिक्षा उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 11:56 PM2018-04-03T23:56:19+5:302018-04-03T23:56:19+5:30

 अंगारकी चतुर्थीनिमित्त तरसोद येथील गणपतीचे दर्शन घेऊन जळगाव शहराकडे येत असलेल्या भाविकांच्या रिक्षाला अपघात होऊन नऊ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नशिराबादकडे जाणाºया प्रवाशी वाहतूक करणा-या वाहनाने कट मारल्यामुळे रिक्षा पलटी झाली. या जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वाहनाने दोन दुचाकींनाही कट मारला. 

In the Jalgaon city, the pilgrims returning to the Ganapati shrine have disappeared | जळगाव शहरात गणरायाचे दर्शन घेऊन परतणा-या भाविकांची रिक्षा उलटली

जळगाव शहरात गणरायाचे दर्शन घेऊन परतणा-या भाविकांची रिक्षा उलटली

Next
ठळक मुद्दे नऊ जण जखमी  महामार्गावर मन्यारखेडा फाट्याजवळील घटना जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल


आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,३ :  अंगारकी चतुर्थीनिमित्त तरसोद येथील गणपतीचे दर्शन घेऊन जळगाव शहराकडे येत असलेल्या भाविकांच्या रिक्षाला अपघात होऊन नऊ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नशिराबादकडे जाणा-या प्रवाशी वाहतूक करणा-या वाहनाने कट मारल्यामुळे रिक्षा पलटी झाली. या जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वाहनाने दोन दुचाकींनाही कट मारला. 


असा झाला विचित्र अपघात
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगावकडून भुसावळकडे भरधाव वेगाने जाणा-या प्रवाशी वाहतूक करणाºया वाहनाने (क्र.एम.एच.१९ बी.एम.६८६८) मंगळवारी दुपारी मन्यारखेडा फाट्याजवळ दुचाकीला (क्र.एम.एच.१९ सी.ई.५७३५) धडक दिली. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने तरसोदकडून गणेशभक्तांना घेऊन येणा-या रिक्षाला (क्र.एम.एच.१९ जे.६४९९) या वाहनाने जोरदार कट मारला. त्यात रिक्षा पलटी झाली. 

जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार
रिक्षा चालकासह ९ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तरसोदचे सरपंच पंकज पाटील व सहकाºयांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले. नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे, राजेंद्र साळुंखे, किरण बाविस्कर, राजेंद्र कोळी, चेतन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली व अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली.

असे आहेत जखमी
प्रभाकर मुरलीधर थोरात (रा.तरसोद, रिक्षा चालक), सुमित्रा राजेंद्र मिस्तरी (वाघ नगर, जळगाव), हिरामण साहेबराव चौधरी, संगीता हिरामण चौधरी (गहुखेडा, ता.रावेर), भारती सुरेश राजपूत (वाघ नगर, जळगाव), कविता शरद पाटील (रा.पळासखेडा, ता.पारोळा), दुस-या वाहनाचा चालक रतन श्रावण चौधरी (रा.जळगाव), दुचाकीवरील मोहम्मद अजहर शेख हमीद, उमेद मोहम्मद रिझवान (भुसावळ) आदी जण जखमी झाले आहेत.

Web Title: In the Jalgaon city, the pilgrims returning to the Ganapati shrine have disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.