जळगाव शहरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यापा-याच्या डोक्यात पिस्तुल तर डोळ्यात मिरची स्प्रे मारुन कार लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:38 PM2018-06-18T12:38:23+5:302018-06-18T12:38:23+5:30
मेहरुण तलावावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नरेंद्र बहादुरसिंग ठाकूर (वय ५९, रा.आदर्श नगर, जळगाव) या व्यापाºयाच्या डोक्यात एकाने पिस्तुल मारुन तर दुस-याने डोळ्यात मिरची पावडरचा स्पे्र मारुन सात लाख रुपये किमतीची नवी कार व खिशातील दोन हजार रुपये लांबविल्याची थरारक घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजता घडली. या घटनेत ठाकूर जखमी झाले असून त्यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगावदि,१८ : मेहरुण तलावावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नरेंद्र बहादुरसिंग ठाकूर (वय ५९, रा.आदर्श नगर, जळगाव) या व्यापाºयाच्या डोक्यात एकाने पिस्तुल मारुन तर दुस-याने डोळ्यात मिरची पावडरचा स्पे्र मारुन सात लाख रुपये किमतीची नवी कार व खिशातील दोन हजार रुपये लांबविल्याची थरारक घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजता घडली. या घटनेत ठाकूर जखमी झाले असून त्यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, नरेंद्र ठाकूर यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. गुजराथी गल्लीत उषा ट्रान्सपोर्ट नावाचे ट्रान्सपोर्ट आहे. सुभाष झिपरु तोतला व जगन्नाथ काळू महाजन या दोन मित्रांसह ठाकूर दररोज सकाळी सहा वाजता स्वतंत्र कार घेऊन मेहरुण तलावाकडे मॉर्निंक वॉकला जातात. सोमवारीही तिघं जण नेहमी प्रमाणे सकाळी सहा वाजता तलावाकडे गेले. कृष्णा लॉनजवळ तोतला व काळे यांनी कार पार्कींग केली. त्यानंतर ठाकूर यांनीही त्यांची कार (एम.एच.१९ बी. यु. ३७६५)पार्कींग केली. काळे व तोतला २० ते २५ फूट पुढे गेल्यानंतर तोंडाला मास्क बांधलेले व काळे कपडे परिधान केलेले दुचाकीवरुन दोन जण आले. दुचाकीवरुन उतरताच ‘गाडी की चावी दे’ असे म्हणत एकाने पिस्तुल काढून त्याची मागची बाजू डोक्यात मारली तर दुसºयाने डोळ्यात मिरची पावडरचा स्पे्र मारुन खिशातील दोन हजार रुपये काढून पोबारा केला.
एकाने दुचाकी तर दुसºयाने कार नेली
या घटनेत काही मिनिटातच हा सारा खेळ झाला. दोघांपैकी एकाने त्याच्याजवळील दुचाकी (क्र.एम.एच.१९-७७११) नेली तर दुसºयाने कारचा ताबा घेतला. कृष्णा लॉन्सच्या दिशेने ते शिरसोली रस्त्यावर लागले. पाचो-याच्या दिशेने गेले की शहराकडे हे समजू शकले नाही. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु केली आहे.