जळगाव शहरातील मेहरुणमध्ये सट्टा सुरुच, वाघ नगरात फलक कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 04:00 PM2018-01-18T16:00:51+5:302018-01-18T16:04:25+5:30
शहरात सुरु असलेल्या सट्टा व्यवसायाबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच गुरुवारी ९० टक्के सटोड्यांनी स्वत:हून दुकान बंद ठेवले. मेहरुणमध्ये महादेव मंदिराला लागून एका नाश्त्याच्या हॉटेलच्या आडोशाला सुरु असलेला सट्टा सुरुच होता तर वाघ नगरातील दुकान बंद झाले होते, मात्र तेथे आकड्यांचा फलक कायम होता. त्यावर सट्ट्याचे आकडे लिहिण्यात आले होते.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१८ : शहरात सुरु असलेल्या सट्टा व्यवसायाबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच गुरुवारी ९० टक्के सटोड्यांनी स्वत:हून दुकान बंद ठेवले. मेहरुणमध्ये महादेव मंदिराला लागून एका नाश्त्याच्या हॉटेलच्या आडोशाला सुरु असलेला सट्टा सुरुच होता तर वाघ नगरातील दुकान बंद झाले होते, मात्र तेथे आकड्यांचा फलक कायम होता. त्यावर सट्ट्याचे आकडे लिहिण्यात आले होते.
शहरातील अवैध धंद्यांबाबत गुरुवारी ‘लोकमत’ ने निर्भिडपणे वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताचे शहरातील नागरिकांनी स्वागत करुन ‘लोकमत’चे आभार मानले. गल्लोगल्ली रहिवाशी वस्ती तसेच प्रमुख रस्त्यावर सटोड्यांनी आपले दुकान मांडले होते. या सट्टा व्यवसायातून महिन्याला एकट्या जळगाव शहरात कोट्यवधीची उलाढाल होत आहे. जुगार, अवैध प्रवाशी वाहतूक, अवैध दारु, वाळू, गुटखा, सोरट यासारखे अवैध धंदेही शहरात सर्रास सुरु आहेत.
पोलीस बॉईज अवैध धंद्यात
शहरात काही ठिकाणच्या सट्टा व्यवसायात राजकारण्यांप्रमाणे पोलीस बॉईजही सक्रीय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन ठिकाणचे सट्टे हे पोलीस बॉईजचेच आहेत. अग्रवाल चौकात एका हॉटेलच्या पाठीमागे तसेच इच्छा देवी पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सट्टा अड्याविषयी अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महामार्गावर भररस्त्यावर सट्टा व्यवसाय चालतो यावरुन धंदेवाल्यांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे सिध्द होते.
एस.पींच्या तंबीनंतरही धंदे सुरु
शहरात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, तसा प्रकार आढळला किंवा कोणाची तक्रार आली तर प्रभारी अधिकाºयांवर कारवाई करण्याची तंबी वजा इशारा पोलीस अधीक्षकांनी गेल्या महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत दिला होता. त्यानंतरही एस.पींना अंधारात ठेऊन प्रभारी अधिकाºयांनी आपल्या हद्दीत बिनधास्तपणे धंदे सुरुच ठेवले होते.
अवैध वाहतुकीतून लाखोचा मलिदा
चित्रविचित्र क्रमांक, दुचाकीवर तीन सीट, वाहन परवाना नसणे अशा कारणांनी सामान्य वाहनधारकांना वेठीस धरणारी वाहतूक शाखा त्यांच्या डोळ्यासमोर शहरातून अवैध प्रवाशी वाहतूक करणाºया खासगी वाहनांवर कारवाई करीत नाही. त्यांच्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले जाते. ट्रॅव्हल्स, कालीपीली, ट्रक यांच्याकडून दरमहा लाखोचा मलिदा गोळा केला जातो. वाहतूक शाखेसह ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध प्रवाशी वाहतूक करणाºया वाहनांचे थांबे आहेत, तेथील वाहनधारकांकडून पोलीस ठाण्याच्या कर्मंचाºयाकडून वसूली केली जाते.