जळगाव जिल्हाधिकारी पोहचले थेट तृतीयपंथीयांच्या दारात
By विलास.बारी | Published: August 20, 2023 04:26 PM2023-08-20T16:26:01+5:302023-08-20T16:27:13+5:30
भारत निवडणूक आयोगाद्वारे सुरु असलेल्या मतदार नोंदणी, मतदार पडताळणी मोहिमेमध्ये गृहभेटींअंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हंबर्डी (ता.यावल) येथील मतदारांची गृहभेट घेतली.
जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रविवारी स्वत : मतदार नोंदणीसह विविध विषयांवर जिल्ह्यातील नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी तृतीयपंथीय मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या.जिल्हाधिकारी यांनी स्वतः समस्या जाणून घेतल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
भारत निवडणूक आयोगाद्वारे सुरु असलेल्या मतदार नोंदणी, मतदार पडताळणी मोहिमेमध्ये गृहभेटींअंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हंबर्डी (ता.यावल) येथील मतदारांची गृहभेट घेतली. मतदार जागृती अभियान व निवडणूक प्रक्रियेविषयी सर्वसामान्य नागरिकांची थेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
भारत निवडणूक आयोगाद्वारे सुरु असलेल्या मतदार नोंदणी,मतदार पडताळणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर (सावदा) येथे तृतीयपंथी मतदारांची गृहभेट घेत संवाद साधला आणि समस्या जाणून घेतल्या.