जळगाव न्यायालयात सरकारी साक्षीदाराला काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:15 AM2018-02-14T00:15:40+5:302018-02-14T00:17:28+5:30

मनोज लोहार खंडणी प्रकरणात फिर्यादी डॉ.उत्तमराव महाजन यांचा मुलगा मनोज याची मंगळवारी न्यायालयात उलटतपासणी सुरु असताना या खटल्यातील सरकारी साक्षीदार तथा कंत्राटदार पुरुषोत्तम पटेल (रा.सुरत, गुजरात) हे न्यायालयात बसलेले असल्याचे लक्षात येताच सरकारी वकीलांनी हरकत घेतली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना बाहेर काढले. त्याची रितसर नोंदही घेण्यात आली.

Jalgaon court extops government witness | जळगाव न्यायालयात सरकारी साक्षीदाराला काढले बाहेर

जळगाव न्यायालयात सरकारी साक्षीदाराला काढले बाहेर

Next
ठळक मुद्दे मनोज लोहार खंडणी प्रकरणफिर्यादीच्या मुलाची उलटतपासणीबुधवारीही होणार आहे कामकाज

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि १३, : मनोज लोहार खंडणी प्रकरणात फिर्यादी डॉ.उत्तमराव महाजन यांचा मुलगा मनोज याची मंगळवारी न्यायालयात उलटतपासणी सुरु असताना या खटल्यातील सरकारी साक्षीदार तथा कंत्राटदार पुरुषोत्तम पटेल (रा.सुरत, गुजरात) हे न्यायालयात बसलेले असल्याचे लक्षात येताच सरकारी वकीलांनी हरकत घेतली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना बाहेर काढले. त्याची रितसर नोंदही घेण्यात आली.
न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरु आहे. मनोज लोहार यांचे वकील सुधीर कुळकर्णी यांनी मनोज महाजन याची उर्वरित राहिलेली उलटतपासणी घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी कुळकर्णी यांनी पुरुषोत्तम पटेल यांच्याकडे असलेल्या तीन डायºयांची झेरॉक्स प्रत न्यायालयात सादर केली. त्यावर जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी हरकत घेतली.परंतु न्यायालयाने त्या डायºयांच्या झेरॉक्स प्रती दाखल करुन घेतल्या.
न्यायालयात मनोज लोहार, उपनिरीक्षक विश्वास निंबाळकर, कॉन्स्टेबल धीरज येवले हे तीनही संशयित आरोपी उपस्थित होते. मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड.अविनाश पाटील यांनी काम पाहिले. 

Web Title: Jalgaon court extops government witness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.