महाराष्ट्र एक्सप्रेसमधून १२ लाखांचे दागिने लंपास, महिलेच्या पर्समधून लांबविला ऐवज

By विजय.सैतवाल | Updated: February 2, 2025 15:16 IST2025-02-02T15:15:45+5:302025-02-02T15:16:12+5:30

Jalgaon Crime News: पुणे येथील नातेवाईकांकडे आयोजित कार्यक्रमाहून बडनेरा येथे परताना संध्या चंद्रकांत राठी (६९, रा. अमरावती) यांच्या पर्समधून रोख १० हजार रुपयांसह ११ लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले.

Jalgaon Crime News: Jewelry worth 12 lakhs stolen from Maharashtra Express, valuables stolen from woman's purse | महाराष्ट्र एक्सप्रेसमधून १२ लाखांचे दागिने लंपास, महिलेच्या पर्समधून लांबविला ऐवज

महाराष्ट्र एक्सप्रेसमधून १२ लाखांचे दागिने लंपास, महिलेच्या पर्समधून लांबविला ऐवज

- विजयकुमार सैतवाल
जळगाव - पुणे येथील नातेवाईकांकडे आयोजित कार्यक्रमाहून बडनेरा येथे परताना संध्या चंद्रकांत राठी (६९, रा. अमरावती) यांच्या पर्समधून रोख १० हजार रुपयांसह ११ लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले. ही घटना १ जानेवारी रोजी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये घडली. या प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

अमरावती येथील संध्या राठी यांच्या नातेवाईकांकडे पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे त्यांच्यासह त्यांचे पती डॉ. चंद्रकांत राठी व अन्य दोन नातेवाईक गेले होते. तेथून ते ३१ जानेवारी रोजी रात्री महाराष्ट्र एक्सप्रेसने बडनेरापर्यंत येण्यास निघाले. प्रवासामध्ये संध्या राठी यांनी सोबत असलेले तीन व दुसरी दोन तोळ्याच्या अशा सोन्याच्या दोन चैन, डायमंड मंगळसूत्र, कानातील आठ तोळ्याचे झुमके, पाच ग्रॅमचे टॉप्स व रोख १० हजार रुपये एका बॉक्समध्ये ठेवून ते पर्समध्ये ठेवले. रात्री झोपल्या त्या वेळी त्यांनी ही पर्स बर्थवर स्वत:जवळच ठेवली. सकाळी सात वाजेच्या सुमारास पाचोरा स्थानकापूर्वी त्यांनी पर्स पाहिली असता त्यात रोकड व दागिने सापडले नाही. त्या वेळी त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, मात्र ऐवज न सापडल्याने त्यांनी रेल्वेच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविली. त्या वेळी तसा संदेश रेल्वे नियंत्रण कक्षातून लोहमार्ग पोलिसांना मिळताच जळगाव स्थानकावरील रेल्वे पोलिस चौकीचे पोहेकॉ सचिन भावसार यांनी जळगाव स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेस आल्यानंतर तक्रार नोंदवून घेतली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Jalgaon Crime News: Jewelry worth 12 lakhs stolen from Maharashtra Express, valuables stolen from woman's purse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.