Jalgaon: अमळनेरात सराईत गुन्हेगारास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 22:28 IST2023-04-11T22:27:58+5:302023-04-11T22:28:28+5:30
Jalgaon: अमळनेर शहरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. सराईत गुन्हेगाराला दरोड्याच्या साहित्यासह अटक करण्यात आली. ही घटना मंगळवारी पहाटे धुळे रोडवर घडली.

Jalgaon: अमळनेरात सराईत गुन्हेगारास अटक
जळगाव : अमळनेर शहरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. सराईत गुन्हेगाराला दरोड्याच्या साहित्यासह अटक करण्यात आली. ही घटना मंगळवारी पहाटे धुळे रोडवर घडली.
जगदीश पुंडलिक पाटील (२१, रा. पिंपळकोठा ता. पारोळा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडील मोटरसायकलच्या नंबर प्लेटवर चिखल लावलेला आढळून आला. तसेच एका पिशवीत दोन चाकू, मिरचीची पूड , नायलॉन दोरीचे बंडल, लोखंडी टाॕमी असे दरोड्याचे साहित्य आढळून आले. जगदीश याने पाच साथीदारांची नावे सांगितली आहेत. हे सर्व जण पोलिसांना पाहताच पळून गेले. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.