जळगाव जिल्ह्यात आणखी 3 कोरोना बाधीत, रुग्ण संख्या 193 वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 11:20 PM2020-05-12T23:20:57+5:302020-05-12T23:21:08+5:30
जळगाव : जिल्ह्यातील जळगाव , अमळनेर, भडगाव, पाचोरा, भुसावळ येथील स्वॅब घेतलेल्या 64 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल ...
जळगाव : जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, भडगाव, पाचोरा, भुसावळ येथील स्वॅब घेतलेल्या 64 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 61 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तीन व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा येथील एक 25 वर्षीय तरूण, भुसावळच्या तलाठी काॅलनीतील एक 18 वर्षीय तरूण तर निंभोरा, ता. भडगाव येथील 28 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 193 इतकी झाली असून त्यापैकी पंचवीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकोणतीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.