जळगावात जिल्हा बॅँक उपाध्यक्षांनी वाजविला बॅँकेसमोर ढोल
By Admin | Published: July 10, 2017 05:32 PM2017-07-10T17:32:45+5:302017-07-10T17:32:45+5:30
कर्जमाफीच्या याद्या जाहीर करण्याची शिवसेनेची मागणी
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.10 -राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करून देखील अद्याप लाभार्थी शेतक:यांच्या याद्या बॅँकांकडून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्या तत्क ाळ जाहीर कराव्यात तसेच शेतक:यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेतर्फे जिल्हा बँकेसमोर सोमवारी दुपारी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. खुद्द जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष व शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनीही जिल्हा बॅँकेसमोर ढोल वाजवून आंदोलन केले.
यावेळी शिवसेनेचे चोपडय़ाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार आर.ओ.पाटील, माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा, माजी जि.प.सदस्या इंदिराताई पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, जिल्हा संघटक हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, जि.प.सदस्य गोपाल पाटील, प्रताप पाटील, बाजार समितीचे संचालक कैलास चौधरी, लकी टेलर, शेतकी संघाचे संचालक रामचंद्र पाटील, महानगरप्रमुख कुलभुषण पाटील, गणेश सोनवणे यांच्यासह शिवसेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
राज्य शासनाकडून शेतक:यांची फसवणूक
ढोल वाजविल्यानंतर जिल्हा बॅँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले. शेतक:यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतक:यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशा घोषणांनी शिवसैनिकांनी जिल्हा बॅँक परिसर दणाणून सोडला. राज्यशासनाकडून कर्जमाफीची घोषणा करून 25 दिवस उलटल्यानंतरही अद्याप शेतक:यांचा याद्या जाहीर केल्या नसल्याने राज्यशासनाकडून शेतक:यांची फसवणूक झाली असल्याचा आरोप माजी आमदार आर.ओ. पाटील यांनी केला.
शासनाने खूप अभ्यास केल्यानंतरही ‘ढ’च- किशोर पाटील
शासनाकडून मोठा अभ्यास केल्यानंतर कर्जमाफी जाहीर केली. मात्र या निर्णयापासून बहुसंख्य शेतकरी वंचित राहिले आहेत. या निर्णयामुळे मोठय़ा अभ्यासानंतर विद्यार्थी ‘ढ’ च राहिला असल्याचा टोमणा आमदार किशोर पाटील यांनी हाणला.