मराठा समाज आरक्षण : जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:36 PM2018-07-25T12:36:59+5:302018-07-25T12:39:57+5:30

अमळनेर येथे मुंडण

Jalgaon district closed in many places | मराठा समाज आरक्षण : जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी कडकडीत बंद

मराठा समाज आरक्षण : जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देमुक्ताईनगर येथे रस्ता रोकोबोदवड तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनपारोळा येथे शाळा, महाविद्यालयदेखील बंद

जळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यात आंदोलन तीव्र होत आहे. बुधवार सकाळपासूनच जिल्ह्यात अनेक ठिकाणी कडकडीत बंद ठेवण्यासह रस्ता रोको, ठिया आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र येत मुंडणदेखील करीत सरकारचा निषेध केला.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्यात बुधवारी आंदोलनाची धार तीव्र होताना दिसून आली. यामध्ये अमळनेर येथे सर्व पक्षीय मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र येत मुंडण केले व बंदची हाक दिली.
जामनेर येथे नगरपालिका चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक ठप्प झाली. बंदमुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी पोहचू न शकल्याने अघोषित सुट्टीचे वातावरण आहे.
मुक्ताईनगर येथे मुंबई-नागपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच भुसावळ तालुक्यातील कुºहे पानाचे येथेदेखील रस्ता रोको आंदोलन करण्यात येऊन घोषणा देण्यात आल्या.
बोदवड येथे तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आले. पारोळा येथे शाळा, महाविद्यालयदेखील बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला.

Web Title: Jalgaon district closed in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.