जळगाव जिल्हाधिका:यांच्या निवासस्थानी ‘मंगल’चा मांडवपरतणीचा कार्यक्रम
By admin | Published: May 23, 2017 12:06 PM2017-05-23T12:06:42+5:302017-05-23T12:06:42+5:30
रावेरहून प्रथमच माहेरी आलेल्या ‘मंगल’जैन व तिच्या सासरच्या मंडळींचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या शासकीय निवासस्थानी स्वागत करण्यात आले.
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.23- सनईचा मंजूळ स्वर.. स्वागतासाठीची लगबग, पाहुणे मंडळींच्या चेह:यावर आनंदाचे भाव अशा वातावरणात रावेरहून प्रथमच माहेरी आलेल्या ‘मंगल’जैन व तिच्या सासरच्या मंडळींचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या शासकीय निवासस्थानी स्वागत करण्यात आले. निमित्त होते मांडव परतणीच्या कार्यक्रमाचे.
स्व. अंबादास पंत वैद्य मतिमंद मूकबधिर बालगृह, वङझर ता. अचलपूर (अमरावती) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या मंगल व भातखेडा ता. रावेर येथील योगेश जैन यांचा आदर्श विवाह सोहळा शहरात 30 एप्रिल रोजी मोठय़ा उत्साहात झाला. या सोहळ्यात मुलीचे मामा म्हणून जबाबदारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी स्विकारली होती. याच जबादारीचा एक भाग म्हणून विवाहानंतर काही दिवसांनी मुलीस माहेरी आणण्याचा सोहळा म्हणजे. मांडवपरतणीचा. पारंपरिक पद्धतीनुसार रविवारी या नवदाम्पत्याला निमंत्रण देण्यासाठी जिल्हाधिकारी निंबाळकर भातखेडा येथे गेले होते. त्यानुसार सोमवारी सायंकाळी हा सोहळा आयोजिण्यात आला होता.
पापळकर बाबांनी केले स्वागत
जिल्ह्याधिका:यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर आपल्या कन्येच्या व व्याह्याच्या स्वागतासाठी शंकरबाबा पापळकर हे सायंकाळपासून उभे होते. या स्वागत सोहळ्याची वेळ जसजशी जवळ येत होती तशी शहरातील मान्यवरांची गर्दी जिल्हाधिका:यांच्या निवासस्थानी होत होती. या सर्वाचे स्वागत पापळकर बाबा स्वत: करत होते.
सनईचा स्वर अन् रोशणाई..
मंगलच्या स्वागतासाठी विद्युत रोशणाई करण्यात आली होती. तर सनईचे मंद व मधुर स्वर मंगलमय वातावरणात भर घालत होते. सायंकाळी 7.45 वाजेच्या दरम्यान, मंगल व योगेश या नवदाम्पत्याचे माहेरी आगमन झाले. सोबत सासरे देवीदास जैन अन्य नातेवाईक मंडळी कार्यक्रम स्थळी दाखल झाली. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन या पाहुणे मंडळींचे स्वागत केले.
औक्षण व ओटी भरण्याचा कार्यक्रम
माहेरी आलेल्या मंगलचे प्रारंभी औक्षण करण्यात आले. त्यानंतर सुवासिनींनी तिची ओटी भरली. यात डॉ. सीमा पाटील, कंचन कांकरिया, हेमा बियाणी, सविता मंत्री, नीलिमा रेदासनी यांचा समावेश होता. यानंतर माहेरचा आहेर म्हणून साडी देखील मंगलला देण्यात आली. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जावई योगेशला व व्याही देवीदास जैन यांना कपडे देऊन त्यांचे स्वागत केले.