जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून वाळूचे २ डंपर पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:30 PM2018-09-19T12:30:30+5:302018-09-19T12:31:16+5:30

‘महसूल’चा धाक संपला

Jalgaon District Collector's office dumped 2 sand dunes from the office | जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून वाळूचे २ डंपर पळविले

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून वाळूचे २ डंपर पळविले

Next
ठळक मुद्देपोलिसात गुन्हा दाखलजप्त वाहन पळविण्याची तिसरी घटना

जळगाव :तहसीलदारांनी सोमवारी राबविलेल्या तपासणी मोहीमेत विना पावती आढळलेले तीन डंपर सोमवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले होते. त्यातील दोन डंपर रात्रीच पळवून नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी निदर्शनास आला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल विभागाचा वाळू माफियांवरील धाक संपला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कानळदा परिसरातून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना सोमवारी १७ रोजी सायंकाळी कानळदा-जळगाव रस्त्यावर लोकांनी अडविले होते. याबाबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार आल्याने जिल्हाधिकाºयांच्या सूचनेवरून तहसीलदार अमोल निकम यांनी घटनास्थळी जाऊन २० डंपर पकडून दूध फेडरेशनपर्यंत आणले होते. तेथे कागदपत्रांची तपासणी केली असता १७ डंपरचालकांजवळ अधिकृत पावती आढळून आली. तर ३ डंपर चालकांजवळ पावती नसल्याने वाळू भरलेले ते डंपर जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आले होते. त्यातील एम.एच.१९ बी.एम.५६५६ व एम.एच.१९ सी.वाय.७५५२ या क्रमांकाचे दोन डंपर पळवून नेल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला.
जप्त वाहन पळविण्याची तिसरी घटना
कारवाई करून जप्त केलेले वाहन तहसील अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून पळवून नेण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी तहसीलदार कार्यालयाच्या आवारातून गेटचे कुलूप तोडून वाहने पळवून नेण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर वाहने जप्त करून संबंधीतांना अटकही करण्यात आली. तर मागच्याच आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून डंपर पळवून नेण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करून संबंधीतास अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ ही तिसरी घटना सोमवारी रात्री ते मंगळवारी सकाळ या दरम्यान घडली आहे. तर कारवाई करतानाच अधिकाºयांच्या ताब्यातून वाहन पळवून नेण्याचे अनेक प्रकार घडले आहेत.
दंड टाळण्यासाठी शक्कल
नवीन वाळू धोरण ३ जानेवारी १८ पासून लागू केल्याने. अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन जर पकडले तर ते वाहन ट्रॅक्टर असल्यास त्यास १ लाख रूपये अधिक वाळूचे २० हजार असा १ लाख २० हजार रूपये दंड तर डंपरला २ लाख ५० हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे दंड टाळण्यासाठी जप्त वाहन पळवून नेण्याचे प्रकार वाढले आहेत.

Web Title: Jalgaon District Collector's office dumped 2 sand dunes from the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.