जळगाव जिल्ह्यात नवीन डीवाय.एसपींची नकार घंटा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 03:41 PM2018-11-17T15:41:06+5:302018-11-17T15:44:46+5:30
जिल्हा पोलीस दलात गेल्या दोन महिन्यापासून अधिकारी बदलींची प्रक्रिया सुरु झाली आहे. चोपडा उपविभागाचे डीवाय.एसपी सदाशिव वाघमारे यांची दोन महिन्यापूर्वी बदली झाली. त्यांच्या जागी आयपीएस सौरभ कुमार अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर जळगाव उपविभागाचे डीवाय.एसपी सचिन सांगळे यांचीही लातूर शहर उपविभागात बदली झाली. आर्थिक गुन्हे शाखेतही शासनाने आता स्वतंत्र डिवाय.एसपीची नियुक्ती केली आहे. जळगाव येथे संजय सांगळे यांची नियुक्ती झाली. मात्र नियुक्तीनंतर ते हजरच झाले नाहीत.
सुनील पाटील
जळगाव : जिल्हा पोलीस दलात गेल्या दोन महिन्यापासून अधिकारी बदलींची प्रक्रिया सुरु झाली आहे. चोपडा उपविभागाचे डीवाय.एसपी सदाशिव वाघमारे यांची दोन महिन्यापूर्वी बदली झाली. त्यांच्या जागी आयपीएस सौरभ कुमार अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर जळगाव उपविभागाचे डीवाय.एसपी सचिन सांगळे यांचीही लातूर शहर उपविभागात बदली झाली. आर्थिक गुन्हे शाखेतही शासनाने आता स्वतंत्र डिवाय.एसपीची नियुक्ती केली आहे. जळगाव येथे संजय सांगळे यांची नियुक्ती झाली. मात्र नियुक्तीनंतर ते हजरच झाले नाहीत.जळगाव गृह डीवाय.एसपी रशीद तडवी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही. चोपडा, व आर्थिक गुन्हे शाखा येथे डीवाय.एसपींची नियुक्ती होऊनही हे दोन्ही अधिकारी अद्याप रुजू झालेले नाहीत तर जळगाव येथे सांगळे यांच्या जागी अद्यापही कोणाची नियुक्ती झालेली नाही. नवीन नियुक्ती नसल्याने सांगळे यांनाही सोडण्यात आलेले नाही. होम डीवाय.एसपींचा पदभार पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्याकडे देण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचाही पदभार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्याकडे आहे.
गेल्या काही वर्षातील पोलीस दल व राजकीय घडामोडी पाहता जळगाव जिल्ह्यात नवीन अधिकारी यायला उत्सुक नाहीत. आजच्या स्थितीत चार डिवाय.एसपींची पदे रिक्त आहेत. ज्या अधिका-यांनी जिल्ह्यात यापूर्वी काम केले आहे, ते अधिकारी मात्र पुन्हा जळगावात येण्यात उत्सुक आहेत. जळगाव डीवा.एसपीसाठी चाळीसगावचे तत्कालिन डीवाय.एसपी अरविंद पाटील व विद्यमान डीवाय.एसपी नजीर शेख यांच्या नावाची चर्चा आहे. क्रिम पोस्ट म्हटली म्हणजे त्या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप आलाच, त्यामुळे राजकीय नेत्यांच्या मर्जीशिवाय महत्वाच्या ठिकाणी नवीन अधिका-याची नियुक्ती होऊ शकत नाहीत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे कडक शिस्तीचे अधिकारी असल्याने येथे नवीन अधिकारीही येण्यास धजावत नाही. चोपड्याला नियुक्त झालेले आयपीएस अधिकारी सौरभकुमार अग्रवाल यांचीही हजर होण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.