राज्यस्तरीय पीक स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा डंका
By विलास.बारी | Published: May 13, 2023 11:05 PM2023-05-13T23:05:46+5:302023-05-13T23:06:30+5:30
पीक स्पर्धा खरीप हंगाम २०२२ साठी घेण्यात आली होती
विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या पीक स्पर्धा खरीप हंगाम २०२२ राबविण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध पिकांमध्ये उत्पादकता वाढवून बाजी मारली.
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकर्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्यातील एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवून ही स्पर्धा घेण्यात येते. या पीक स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर/ विभागस्तरावर निवड झालेली आहे.
पीक-खरीप ज्वारी (सर्वसाधारण गट, खरीप हंगाम २०२२)
ज्ञानेश्वर चिंतामण पाटील (मु. गहुखेड, ता. रावेर राज्यस्तर द्वितीय क्रमांक), अर्जुन दामू पाटील (मु. वडगाव, ता. रावेर राज्यस्तर तृतीय क्रमांक), सुशील संतोष महाजन, (मु. खडका, ता. भुसावळ विभागस्तर प्रथम क्रमांक), ज्ञानदेव बाबूराव पाटील (मु. सुसरी, ता. भुसावळ विभागस्तर द्वितीय क्रमांक), श्रावण शेनफड धनगर (मु. काहुरखेडा, ता. भुसावळ विभागस्तर तृतीय क्रमांक).
पीक- बाजरी (सर्वसाधारण गट, खरीप हंगाम २०२२)
सरदार गिरधर भिल (मु. सांगवी, ता. चाळीसगाव विभागस्तर तृतीय क्रमांक).
पीक- मका (सर्वसाधारण गट, खरीप हंगाम २०२२)
मोहन काशिनाथ पाटील (मु. होळ, ता. रावेर विभागस्तर प्रथम क्रमांक), किशोर हरीश गनवणी (मु. पो. ता. रावेर विभागस्तर, तृतीय क्रमांक)
पीक- तूर (सर्वसाधारण गट, खरीप हंगाम २०२२)
प्रांजली गजेंद्र तायडे (मु. चिंचखेडा बु., ता. मुक्ताईनगर विभागस्तर प्रथम क्रमांक), तेजस प्रवीण अग्रवाल (मु. बेलसवाडी, ता. मुक्ताईनगर विभागस्तर द्वितीय क्रमांक), विश्वनाथ शामू पाटील (मु. पिंप्रिनादू, ता. मुक्ताईनगर विभागस्तर तृतीय क्रमांक).
पीक- मूग (सर्वसाधारण गट, खरीप हंगाम २०२२)
विजय छबीलाल पाटील (मु. वाघोदे, ता. अमळनेर विभागस्तर प्रथम क्रमांक), प्रदीप दामोदर पाटील (मु. पिंगळवाडे, ता. अमळनेर विभागस्तर द्वितीय क्रमांक), नहुष आबा पाटील (मु. पिंगळवाडे, ता. अमळनेर) यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे.