जळगाव जिल्ह्यात गतवर्षी १७ जूनपर्यंत झाला होता २७ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:52 AM2019-06-19T11:52:37+5:302019-06-19T11:53:48+5:30

पावसाळ्याच्या १५३ पैकी सरासरी ६३ दिवसच पर्जंन्यवृष्टी

Jalgaon district had 27 mm rain till June 17 last year | जळगाव जिल्ह्यात गतवर्षी १७ जूनपर्यंत झाला होता २७ मिमी पाऊस

जळगाव जिल्ह्यात गतवर्षी १७ जूनपर्यंत झाला होता २७ मिमी पाऊस

googlenewsNext

जळगाव : हवामानातील बदलामुळे पावसाचे दिवस कमी होत आहेत. पावसात खंड पडण्याचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी पावसाळ्याच्या १५३ दिवसांपैकी जेमतेम ६३ दिवसच पावसाने हजेरी लावलीे. तरीही गत वर्षी १७ जूनपर्यंत २७.१ मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र जेमतेम २.७ मिमी पाऊस नोंदला गेला असून पावसाचे आगमन जूनच्या शेवटच्या आठवड्यात होण्याचे संकेत मिळत आहेत.
बदलत्या हवामानामुळे पिकांच्या पारंपरीक लागवडपद्धतीवरही विपरित परिणाम होत असून पाऊस लांबल्याने उडीद-मूग लागवड घटण्याची शक्यता आहे.
असे मोजतात पर्जन्यमान
जिल्ह्यात महसूल प्रशासनाने ८६ मंडळांच्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविले आहेत. या पर्जन्य मापकाचा एक भाग जमिनीत असतो. तर या पर्जन्यमापकातील भांड्यात जमलेले पाणी चुंचुपात्रात घेऊन मोजले जाते. त्यावरून किती पाऊस झाला? ते कळते.
पावसाळ्यातील ९० दिवस होते कोरडे
२.५ मिमीपेक्षा कमी अथवा काहीही पाऊस न झालेला दिवस हा कोरडा दिवस म्हणून समजला जातो. मागील वर्षी मागील वर्षी १ जून २०१८ ते ३१ आॅक्टोबर २०१८ या १५३ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ९० दिवस पावसाने दडी मारली. म्हणजेच इतके दिवस कोरडे गेले.
तालुकानिहाय कोरडे दिवस
जळगाव- ९७
भुसावळ-१०१
यावल- ९४
रावेर-९०
मुक्ताईनगर- १०८
अमळनेर-१०५
चोपडा-८४
एरंडोल-८९
पारोळा-९६
चाळीसगाव-१०८
जामनेर-८३
पाचोरा-८९
भडगाव-९६
धरणगाव-९३
बोदवड-१०६

Web Title: Jalgaon district had 27 mm rain till June 17 last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव