जळगाव जिल्ह्यात ‘डिपीडीसी’वरील १४ विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:22 PM2019-12-21T12:22:21+5:302019-12-21T12:23:04+5:30

तीन नामनिर्देशित सदस्यांचाही समावेश

Jalgaon district has canceled the appointment of 3 special invited members of 'DPDC' | जळगाव जिल्ह्यात ‘डिपीडीसी’वरील १४ विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

जळगाव जिल्ह्यात ‘डिपीडीसी’वरील १४ विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

Next

जळगाव : जिल्हा नियोजन समितीवर (डीपीडीसी) पाच महिन्यांपूर्वीच नियुक्त करण्यात आलेल्या १४ ‘विशेष निमंत्रित’ सदस्य तसेच तीन नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या शासनाने रद्द केल्या आहे. तसे आदेश शासनाच्या नियोजन विभागाने २० डिसेंबर रोजी काढले असून या विषयी प्रत्येक जिल्ह्याला कळविण्यात आले आहे. विशेष म्हणजे साडेचार वर्षे रखडलेल्या या नियुक्त्या जुलै २०१९ मध्येच करण्यात आल्या होत्या. आता सरकार बदलताच त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
जिल्हा नियोजन समितीवर ‘विशेष निमंत्रित’ सदस्यांच्या नियुक्त्या साडेचार वर्षे रखडल्या होत्या. गेल्या वेळच्या सरकारचा चार वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण होत आला तरी या नियुक्त्या झालेल्या नव्हत्या. जिल्हा नियोजन समितीवर या नियुक्त्या करायच्या असल्याने त्या विषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिवांनी शासनाला ७ फेब्रवारी २०१९ रोजी पत्र दिले होते. त्यानुसार शासनाने १२ जुलै २०१९ रोजी जिल्ह्यातील १४ जणांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. त्या दरम्यान तीन नामनिर्देशित सदस्यांचीही निवड करण्यात आली होती.
सध्या जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद गटातून २७, नगरपरिषद गटातून ९ तर महापालिका गटातून ४ असे एकूण ४० सदस्य आहेत. या व्यतिरिक्त १४ विशेष निमंत्रित सदस्य व नियोजन समितीच्या कार्यकारी समितीवर एक खासदार व दोन आमदार असे तीन नामनिर्देशित सदस्यांचीदेखील निवड झाली होते.
जिल्हा नियोजन समितीवरील ४० सदस्यांव्यतिरिक्त उर्वरित सर्व सदस्यांच्या नियुक्त्या या आदेशाने रद्द झाल्या आहेत.
या विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या झाल्या रद्द
धर्मराज रामा वाघ (दहीवद, ता. चाळीसगाव), गजेंद्र अरविंद जायसवाल (चोपडा), रावसाहेब रतनसिंग गिरासे (बोळे, ता. पारोळा), पंकज पंडित चौधरी ( अमळनेर), पद्माकर काशिनाथ महाजन ( रसलपूर, ता. रावेर), मनोहर गिरधर खैरनार ( मुक्ताईनगर), तुषार किसन राणे ( सालबर्डी, ता. मुक्ताईनगर), अ‍ॅड. साहेबराव धर्मा सोनवणे (चोपडा), भागचंद मोतीलाल जैन ( जळगाव), अरुण रुपचंद पाटील (कुºहाड बु. ता. पाचोरा), सुरेश माणिक सोनवणे (जळगाव), हिरालाल व्यंकट चौधरी ( वनोली ता. यावल), समाधान लक्ष्मण पाटील (कुºहे, ता. भुसावळ), जगन्नाथ खंडू चव्हाण (जामनेर).
नियुक्त्या रद्द झालेले नामनिर्देशित सदस्य
खासदारउन्मेष पाटील,आमदार किशोर पाटील,माजीआमदार हरिभाऊ जावळे.

Web Title: Jalgaon district has canceled the appointment of 3 special invited members of 'DPDC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव