जळगाव जिल्ह्यात ९५ टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:44 PM2019-07-16T12:44:32+5:302019-07-16T12:45:01+5:30

पावसाने जास्त दडी मारल्यास अडचण

Jalgaon district has completed 95% sown | जळगाव जिल्ह्यात ९५ टक्के पेरण्या पूर्ण

जळगाव जिल्ह्यात ९५ टक्के पेरण्या पूर्ण

googlenewsNext

जळगाव : पावसाने यंदा उशिराने हजेरी लावल्याने पेरण्याही उशिराने सुरू झाल्या असून आतापर्यंत ९५ टक्के पेरण्या आटोपल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान गतवर्षापासून मका व सोयाबिनच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र मक्यावर यंदा मोठ्याप्रमाणावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याचे संकेत असून त्यादृष्टीने कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर कीटकनाशकही उपलब्ध करून दिले आहे.
जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र कृषी आयुक्तालयाने वाढवून ८ लाख ८ हजार हेक्टर दाखविले असले तरीही सर्वसाधारणपणे ७ लाख २७ हजार हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रावरच प्रत्यक्षात लागवड होते. मागील वर्षी या पूर्ण क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यंदा ६ लाख ५० हजार हेक्टरवर पेरण्या झाल्याचा अधिकृत आकडा कृषी विभागाकडे प्राप्त झाला असला तरीही हा आकडा जुना असून त्यात आता वाढ होऊन सुमारे ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
कापसाची ४ लाख ५८ हजार हेक्टरवर पेरणी
जिल्ह्यातील सर्वाधिक ५ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र कापसाचे असून आतापर्यंत ४ लाख ५८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. मात्र हे क्षेत्र ५ लाख हेक्टरच्यावर जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मक्यावर लष्करी अळी
मक्याचे सरासरी क्षेत्र ८८ हजार ७८४ हेक्टर असले तरी आतापर्यंत ७३ हजार हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. हे क्षेत्र ८५ हजार हेक्टरपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. मात्र मक्यावर जेथे लागवड जास्त आहे, तेथे आतापासूनच अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्णातील १५ तालुक्यातील १७ डिलर्सकडे औषधी ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली आहेत. याखेरीज कापूस, सोयाबीन व ज्वारीवर विविध किडींसाठीचे कीटकनाशकेही ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी नजीकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
शेतकऱ्यांनी त्यांनी लागवड केलेल्या पिकासाठी स्वयंघोषणापत्र सादर करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परवाना प्राप्त करून घ्यायचा आहे.
हा परवाना महाराष्टÑ कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्यामार्फत त्यांच्या अधिकृत डीलरकडे देऊन ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके उचल करावीत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
पावसाने दडी मारल्याने चिंता
पावसाचे उशीरा आगमन झाले असले तरीही जिल्ह्यात पावसाने बºयापैकी हजेरी लावली आहे. जून व जुलैची मिळून पावसाची सरासरी २३०.१ मिमी असली तरीही आतापर्यंत त्यापैकी १७०.८ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच संपूर्ण पावसाळ्यात होणाºया पावसाच्या २५.८ टक्के पाऊस झाला आहे. मात्र गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाचा हा खंड जर वाढला तर मात्र पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होण्याची भिती आहे.तसेच ज्या पिकांची उगवण झाली आहे. त्यांच्यावर किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे.
पीकविम्यासाठी २४ पर्यंत मुदत
पीक विम्यासाठीची मुदत वाढविण्यात आली असून २४ जुलै करण्यात आली आहे. त्यामुळे श्ोतकºयांची पीक विमा काढण्यासाठी गर्दी होत आहे. दरम्यान पीक विमा कंपनीतर्फे १९ रोजी सकाळी ११ वाजता अल्पबचत भवन येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

Web Title: Jalgaon district has completed 95% sown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव