जळगाव जिल्ह्यात २७७४ कोटींचे मुद्रा लोन तरी तरुणांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:22 PM2018-10-10T12:22:43+5:302018-10-10T12:27:48+5:30

आकडेवारीबाबत संशय

Jalgaon district has a loan of 2774 crores, but it is worth mentioning that the youths' description | जळगाव जिल्ह्यात २७७४ कोटींचे मुद्रा लोन तरी तरुणांची वणवण

जळगाव जिल्ह्यात २७७४ कोटींचे मुद्रा लोन तरी तरुणांची वणवण

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजीलाभार्थी निवडूनच दिला जातोय लाभ

जळगाव : गेल्या साडेतीन वर्षात ५ लाख ४४ हजार अर्जदारांना २ हजार ७७४ कोटी ८९ लाखांचे मुद्रा लोन वाटप करण्यात आले असल्याचा दावा बँकांकडून केला जात असला तरीही प्रत्यक्षात यात बनवाबनवी होत असून जुन्या मर्जीतील कर्जदारांनाच मुद्रालोनचा लाभ देण्याचे अथवा अन्य प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. कर्जवाटपाची व लाभार्थ्यांची आकडेवारी मात्र फुगलेली दिसत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत मुद्रालोन वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लाभार्थ्यांच्या याद्या देखील सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सुशिक्षीत बेरोजगारांना नवीन व्यवसाय, स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी बँकांकडून सहजासहजी अर्थसाह्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे शासनाने मुद्रा योजनेद्वारे हे कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच व्यवसाय वृद्धीसाठीही या योजनेतून कर्ज मिळू शकते. मात्र शासन व्याजाचा भार उचलण्याची हमी घेत असतानाही बँकांकडून मात्र मुद्रालोन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. बऱ्याचदा तर बँकांकडून उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी व्यवसाय वृद्धीसाठी अथवा मर्जीतील जुन्या कर्जदारांनाच हे मुद्रालोन देऊन व्याजाचा लाभ दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कर्जवाटपाची आकडेवारी व लाभार्र्थींची आकडेवारी फुगलेली दिसते. प्रत्यक्षात लाभ मात्र गरजूंना मिळतच नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमकी हीच बाब हेरून आढावा बैठकीत अधिकाºयांना धारेवर धरले. सरकार व्याजाची हमी घेत असतानाही कर्जवाटपास टाळाटाळ करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत अशा बँक अधिकाºयांवर कारवाईचे आदेशही जिल्हाधिकाºयांना दिले आहेत.
लाभार्थी निवडूनच दिला जातोय लाभ
मुद्रा कर्ज योजनेचे नोडल आॅफिसर तथा लीड बँकेचे मॅनेजर अरूण प्रकाश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बँका मुद्रा लोन देताना ते जुन्या कर्जदाराला देऊन आकडेवारी फुगवीत नाही. आम्ही सादर केलेली आकडेवारीही राज्यस्तरावरील आकडेवारीतून काढलेली असून अचूक आहे. फक्त या कर्जाला कुठलेही तारण नसल्याने कर्जफेड न करण्याचे प्रमाण ९०-९५ टक्के असते. त्यामुळे बँका कर्ज देताना योग्य लाभार्थी निवडण्यासाठी अधिक निकष लावतात. ज्याला व्यवसाय करायचा आहे, त्याला हे कर्ज द्यायचे आहे. मात्र बहुतांश अर्जदार हे कर्ज मिळतेय म्हणून अर्ज करीत असतात. ते व्यवसाय करण्याबाबत ठाम नसतात. त्यातून व्यवसाय करण्यासाठीच कर्ज हवे असलेले शोधून त्यांनाच कर्ज दिले जाते.
अशी आहे मुद्रा लोनची आकडेवारी
२०१५-१६ या वर्षात १ लाख १६ हजार ७५९ खातेदारांना (लाभार्थ्यांना) ८१८ कोटी ९० लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले. २०१६-१७ या वर्षात १ लाख ४२ हजार २९ खातेदारांना ९५९ कोटी ५७ लाख रूपये तर २०१७-१८ या वर्षात २ लाख ३ हजार ७९९ खातेदारांना ७१० कोटी २९ लाखांचे तर २०१८-१९ या वर्षात सप्टेंबर अखेर ८२ हजार २११ खातेदारांना २८६ कोटी १३ लाखांचे असे एकूण ५ लाख ४४ हजार ७९८ खातेदारांना २७७४ कोटी ८९ लाखांचे कर्ज (मुद्रा लोन) वाटप करण्यात आले आहे.

Web Title: Jalgaon district has a loan of 2774 crores, but it is worth mentioning that the youths' description

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.