जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ३२३ मिलीमीटर पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 08:59 PM2020-07-21T20:59:22+5:302020-07-21T20:59:39+5:30
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असून हा पाऊस जिल्ह्यातील पिकांना जीवदान ठरत आहे. अनेक दिवसांच्या ...
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असून हा पाऊस जिल्ह्यातील पिकांना जीवदान ठरत आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसामुळे आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ५०़५४ टक्के इतका पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे़
दरम्यान, जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६२८़२२ मिलीमीटर इतके असून मागील वर्षी २० जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या २२़७८ टक्के म्हणजेच १४५़२२ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. तर यावर्षी ३२२़५९ मिलीमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ५०़५४ टक्के इतका पाऊस पडला आहे.
सर्वाधिक पाऊस अमळनेर तालुक्यात
जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता आतापर्यंत सर्वाधिक ६९़७४ टक्के इतका पाऊस अमळनेर तालुक्यात पडला असून सर्वात कमी म्हणजेच ४०़६९ टक्के पाऊस भुसावळ तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात २० जुलै रोजी एका दिवसात ५़६९ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात झालेला पाऊस
जळगाव तालुका- ३४२़७२ मिलीमीटर (५०़८६ टक्के), जामनेर- ३२३.३० मि.मी., (४६़९५), एरंडोल- २८४़५० मि.मी. (४७़१५), धरणगाव - ३०७़८३ मि.मी. (४५़३७), भुसावळ - २४४़६० मि.मी. (४०़६९), यावल - २८२़५ मि.मी. (४३़८९), रावेर - ३१८़४३ मि.मी. (४९़२७), मुक्ताईनगर - २९७़३० मि.मी. (५२़०८), बोदवड - २७४़५८ मि.मी. (४०़८४), पाचोरा - ३३०़४६ मि.मी. (५१़२२), चाळीसगाव - ३५६़३२ मि.मी. (५५़८८), भडगाव - ३३५ मि.मी. (५१़८३) अमळनेर - ४१०़६० मि.मी. (६९़७१), पारोळा - ३०२़१० मि.मी. (४८़७४), चोपडा - ४२९़०६ मि.मी. (६५ टक्के) याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या ५०़५३ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.