जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा; नागदुली येथे वीज पडून शेतकरी ठार
By चुडामण.बोरसे | Published: April 12, 2024 07:56 PM2024-04-12T19:56:51+5:302024-04-12T19:57:10+5:30
ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडली.
जळगाव : जिल्ह्याच्या काही भागात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने तडाखा झाला. पाऊस व गारामुळे ज्वारी, बाजरीसह चाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अंगावर वीज पडून नागदुली ता. एरंडोल येथे श्रीकांत भिका महाजन (३२) हा तरुण शेतकरी ठार झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडली.
अमळनेर व यावल तालुक्यात गारा पडल्या. प्रचंड वादळामुळे अनेक ठिकाणचे पत्रे उडाले तर झाडेही उन्मळून पडली आहेत.
वडगाव कडे ता. पाचोरा येथे वीज कोसळून गाय ठार झाली. आबा महादू पाटील यांच्या मालकीची ही गाय होती. बाळद, सातगाव, शिंदाड ता. पाचोरा आणि कजगाव ता. भडगाव येथेही पावसाने तडाखा दिला आहे.