जळगाव जिल्हा रुग्णालयात गुटखा खाणा:या वैद्यकीय अधिका:यालाच दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:29 AM2017-08-31T00:29:01+5:302017-08-31T00:30:27+5:30
खळबळ : जिल्हा शल्य चिकित्सकांची कारवाई
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 30 - एरंडोल रुग्णालयाचा पदभार मिळण्याच्या मागणीसाठी गुटखा खाऊन थेट जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात जाणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश खेताडे यांना दंड करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांच्या आदेशावरून करण्यात आलेल्या या कारवाईने जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली.
तंबाखूजन्य पदार्थांपासून लांब राहण्याचे डॉक्टरच इतरांना सांगतात. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये तबाखूजन्य पदार्थ खाण्यास बंदी असतानाही वैद्यकीय अधिकारी डॉ. खेताडे हे गुटखा खाऊन जिल्हा रुग्णालयात शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांच्या दालनात गेले. डॉ. खेताडे यांनी तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याचे लक्षात येताच डॉ. चव्हाण यांनी डॉ. खेताडे यांना 200 रुपये दंड केला. त्यानंतर डॉ. खेताडे यांनी केवळ 100 रुपये दंड भरला.
डॉ. शशिकांत बेंद्रे, डॉ.विजय जयकर यांच्या उपस्थितीत मुख्य प्रशासकीय कार्यालयात कारवाई करण्यात आली.
जिल्हा रुग्णालयात कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. डॉ. दिनेश खेताडे हे गुटखा खाऊन आल्याने त्यांना दंड करण्यात आहे. व्यसनांविरूध्द प्रबोधन करतो आणि आमचेच लोक व्यसन करतील हे योग्य नाही. यापुढेही गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
- डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक