जळगाव जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:04 AM2017-10-02T00:04:02+5:302017-10-02T00:06:51+5:30

‘मेडिकल हब’साठी निर्णय : वैद्यकीय अधिकारी कार्यमुक्त, अतिरिक्त शल्य चिकित्सक झाले वैद्यकीय अधीक्षक

Jalgaon District Hospital transferred to Medical Education Department | जळगाव जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत

जळगाव जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत

Next
ठळक मुद्देआंतरशाखीय संशोधनास चालनावैद्यकीय अधिकारी होणार वर्गआरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागात होणार करार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 1 - शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (मेडिकल हब) सुरू करण्यासाठी  जिल्हा रुग्णालय आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा अंतिम निर्णय झाला असून राज्यपालांच्या आदेशानुसार अवर सचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल यांनी तसे आदेश काढले आहे. या निर्णयामुळे प्रगत वैद्यकीय शिक्षण तसेच आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होणार आहेत. 
जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकूल उभारण्यात येणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीबाबतची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये केली होती. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकाच ठिकाणी किमान 50 हेक्टर जागा मिळावी असा प्रस्ताव होता. त्यानुसार तीन ठिकाणच्या जागा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पथकाने बघून कुसुंबा येथे जागा निश्चित केली आहे.   46.56 हेक्टर जागेत हे शासकीय एकात्मिक वैद्यकीय संकूल उभारण्यात येणार आहे.

‘सिव्हील’पासून सुरूवात 
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले जिल्हा रुग्णालय हे 12 एकरात उभारण्यात आले आहे. 400 खाटांचे हे रुग्णालय असून या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या व दुस:या वर्षाच्या विद्याथ्र्याना शिक्षण देणे प्रस्तावित आहे. सद्य स्थितीत जिल्हा रुग्णालयाची ही जागा आरोग्य विभागाकडे आहे.  मात्र आता येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे असल्याने ही जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.  

जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाल्याने यासाठी आता सार्वजनिक आरोग्य विभाग (जिल्हा शल्य चिकित्सक)  व वैद्यकीय शिक्षण विभाग (अधिष्ठाता) यांच्यात करार होणार असून तो केवळ तीन वर्षासाठी राहणार आहे. त्यानंतर हा करार आपोआप संपुष्टात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  या ठिकाणी अधिष्ठाता नियुक्त केले असून तेच या महाविद्यालयाचे प्रमुख असतील.  हा करार सोमवार किंवा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. 

जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या 13 वैद्यकीय अधिका:यांना कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांच्यासह सर्व तांत्रिक कर्मचारी, परिचारिकादेखील वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे.

डॉ. किरण पाटील वैद्यकीय अधीक्षक 
जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक वगळता सर्व अधिकारी (डॉक्टर) वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग  होणार असल्याने जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील हे आता वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहणार आहे. 

1260 कोटी 60 लाख निधीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत यापूर्वीच मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे संकूल उभारण्यास गती मिळणार आहे. या संकुलामध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच 100 विद्यार्थी क्षमतेचे आयुव्रेद महाविद्यालय, 50 विद्यार्थी क्षमतेचे दंत महाविद्यालय, 50 विद्यार्थी क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय, 40 विद्यार्थी क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय राहणार आहे. या संकुलाच्या उभारणीतून आधुनिक तसेच प्राचीन भारतीय वैद्यकीय चिकित्सा पद्धतीमध्ये आंतरशाखीय संशोधनास चालना मिळणार आहे. 

असे चालणार कामकाज
रुग्णालय इमारतीतील 5000 चौ.फूट जागा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प्रशासकीय कार्यालय इत्यादीसाठी व 5000 चौ. फूट जागा ही औषध भांडारसाठी असे एकूण 10 हजार चौ. फूट क्षेत्र आरोग्य विभागाकडे व उर्वरित जागा करार सुरू असेर्पयत अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली राहणार आहे. 
कार्यालयीन व रुग्णालयीन प्रशिक्षण विभाग, जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, कुटीर रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय हे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अखत्यारीत तर उर्वरित सर्व विभागाचे अधिष्ठातांच्या अखत्यारीत कामकाज चालेल. 
यामध्ये नेत्र विभाग व नेत्र पथक हे पूर्वीप्रमाणेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अखत्यारीत राहण्यासह अपंगत्व तपासणी मंडळ गट अ व ब अधिका:यांसाठीची मंडळेदेखील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अखत्यारीत राहतील. 

वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाला असून लवकरच करार होईल. 
- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.

वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याने वैद्यकीय अधिकारीदेखील वर्ग होणार आहेत. त्यासाठी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. 
- डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.

Web Title: Jalgaon District Hospital transferred to Medical Education Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.