जळगाव जिल्ह्यात अल्पभूधारकांचे 656 कोटींचे कर्ज होऊ शकते माफ
By Admin | Published: June 13, 2017 11:13 AM2017-06-13T11:13:26+5:302017-06-13T11:13:26+5:30
शेतक:यांना दिलासा मिळणार : 4 लाख 92 हजार 410 खातेदारांपैकी 1 लाख 60 हजार अल्पभूधारक
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.13 : राज्य शासनाने सरसकट कजर्माफी ऐवजी अल्पभूधारक शेतक:यांचे कजर्माफ करण्याची घोषणा केली आहे. याची अंमलबजावणी झाल्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 1 लाख 60 हजार 985 अल्पभूधारक खातेदारांना याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडील 656 कोटींचे कजर्माफ होऊ शकते. या बाबत जिल्हा बॅँक, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत.
शासनाने केलेल्या घोषणेसंदर्भात अद्याप कसलेही निर्देश सोमवारी येथे प्राप्त झाले नसले तरी जिल्हा बँकेने अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक खातेदारांची माहिती तयार ठेवली आहे. ही माहिती शासनाने यापूर्वीच जिल्हा बँक व जिल्हा उपनिबंधकांकडून मागितली आहे. त्यानुसार ती माहिती शासनाकडे पाठविण्यात आली असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
4 लाखावर खातेदार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कार्यक्षेत्रातील एकूण खातेदार शेतक:यांची संख्या 5 लाख 14 हजार 97 एवढी आहे. त्यापैकी वि.का.सहकारी संस्थांमार्फत कर्ज घेणा:या सभासदांची संख्या 4 लाख 92 हजार 410 एवढी आहे. यात अल्पभूधारक व मोठय़ा कर्जदारांचा समावेश आहे. शेतीशी निगडीत वस्तू, बियाणे, रासायनिक खते खरेदीसाठी हे सभासद कर्ज घेत असतात.
10 एकरापेक्षा जास्त जमीन असलेले खातेदार 11 हजार
जिल्हा बॅँकेकडे 10 एकरापेक्षा जास्त जमिन असलेल्या खातेदारांची संख्या 11 हजार 718 एवढी आहे. या खातेदारांकडे थकीत असलेल्या कर्ज 81 कोटी 85 लाख एवढे असल्याची माहितीही शासनाकडे पाठविण्यात आली आहे.