जळगाव जिल्हा दूध संघात कर्मचारी निलंबनानंतर समिती नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2017 02:01 PM2017-04-12T14:01:51+5:302017-04-12T14:01:51+5:30

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात अपहार केल्याच्या प्रकरणात निलंबित केल्यानंतर चौकशीसाठी समिती गठीत केली आहे.

In Jalgaon District Milk Union, the employees are appointed after suspension of the committee | जळगाव जिल्हा दूध संघात कर्मचारी निलंबनानंतर समिती नियुक्त

जळगाव जिल्हा दूध संघात कर्मचारी निलंबनानंतर समिती नियुक्त

Next

 जळगाव ,दि.12- जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात चिंचखेडा ता.जामनेर येथील धूपेश्वर दूध पुरवठादार गटासह इतर गटांच्या नावांवर आलेल्या दूधाचे आकडे फुगवून अपहार केल्याच्या प्रकरणात गणकयंत्र विभागातील  कर्मचारी किरण पाटील व भूषण गोपाळ नेमाडे यांना निलंबित केल्यानंतर या प्रकरणी चौकशीसाठी समिती गठीत केली आहे. ही समिती लवकरच संचालक मंडळासमोर चौकशी अहवाल सादर करणार असल्याची माहिती आहे. चौकशी समितीमध्ये संचालक अशोक पाटील व दूध संघातील राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे (एनडीडीबी) प्रतिनिधी असलेले अनिल हातेकर यांचा समावेश असल्याची माहितीसूत्रांनीदिली.

सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणात निलंबित झालेले दोन्ही कर्मचारी हे कनिष्ठ पातळीवरील आहे. त्यातील किरण पाटील हे दिव्यांग आहे. संगणकावरील कामकाज ते पाहतात. दूध संकलानासंबंधीची आकडेमोड ते करायचे.. अशातच चिंचखेडा येथील धूपेश्वर गटासह इतर गटांकडून आलेल्या दूधाचे आकडे अधिकचे दाखवून त्यासंबंधीचे धनादेश अदाही झाल्याचे कळते. 
दूध पुरवठादार गटांचे नाव वापराची मोडस ऑपरेंडी
दूध पुरवठादार गट हे नोंदणीकृत सहकारी दूध सोसायटीमध्ये मोडत नाही. या गटांच्या माध्यमातून येणारे दूध कमी, अधिक दाखविणे सहज शक्य आहे.. तसेच या गटाचे संचालक, सचिव, ऑडीट.., असे कागदोपत्री कुठलेही विषय बंधनकारक नाहीत.. जसे काठेवाडी संघाला दूधपुरवठा करतात.. काठेवाडी कितीही लीटर क्षमतेत पुरवठा करू शकतात.. तसेच गटही पुरवठा करू शकतात.. त्यामुळे गटांच्या नावे हेराफेरी करणे सहज शक्य झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष कसे झाले.. हा प्रश्नही यानिमित्त काही संचालकांनी दबक्या आवाजात उपस्थित केला आहे. 

Web Title: In Jalgaon District Milk Union, the employees are appointed after suspension of the committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.