जळगाव जिल्ह्यात वाढले २० हजार ७७८ मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:38 PM2019-09-01T12:38:10+5:302019-09-01T12:38:40+5:30
विधानसभा निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी जाहीर
जळगाव : लोकसभा निवडणूक होताच आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत़ त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी अंतिम मतदार यादी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. लोकसभा निवडणुक झाल्यानंतर जिल्ह्यात २० हजार ७७८ मतदारांची वाढ झाली असून त्यामुळे आता जिल्ह्यातील मतदारांची संख्या ही ३४ लाख ४७ हजार १८४ पर्यंत पोहोचली आहे़
विधानसभा निवडणुकीचा बिगुल लवकरचवाजणार आहे़ त्यामुळे निवडणूक विभागाने मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविले होते़ या अभियानात नवोदित मतदारांसोबत सुटलेल्या मतदराची नावे नोंदविण्यात आली़ दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी १९ आॅगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येणार होती़ मात्र, नंतर यास राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली होती़ अखेर मतदरांची अंतिम यादी शनिवारी प्रसिध्द करण्यात आली़ दरम्यान, जिल्ह्यात एकूण २० हजार ७७८ मतदारांची नावे नव्याने मतदान यादीत समाविष्ट करण्यात आली आहे़ आता जिल्ह्यातील मतदारांचा आकडा ३४ लाख ४७ हजार १८४ वर पोहोचला आहे़
१७९६३५० पुरूष तर १६५०७४१ महिला मतदार
शनिवारी अकरा मतदार संघांतील मतदारांची आकडेवारी प्रसिध्द झाली असून यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी यंदा जिल्ह्यात १७ लाख ९६ हजार ३५० पुरूष मतदार आहेत तर १६ लाख ५० हजार ७४१ महिला मंतदारांचा समावेश आहेत़ तर ९३ तृतीयपंथी बांधव मतदारांचा समावेश आहेत़ सन २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ३१ लाख २५ हजार ११६ मतदार होते़ ते गेल्या पाच वर्षात या मतदारसंख्येत ३ लाख २२ हजार ६८ ने वाढ झाली आहे़ आताची मतदारसंख्या ही ३४ लाख ४७ हजार १८४ आहे़
३ हजार ५३२ केंद्र
विधानसभा निवडणुकीसाठी यंदा ३ हजार ५३२ मतदान केंद्र असणार आहे़ त्यामुळे आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे़ तश्या हालचाली सुध्दा सुरू झाल्या आहेत़
बीएलओंशी संपर्क साधावा
मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी आपले मतदार यादीत नाव आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. नावे नसल्यास त्यांनी त्यांच्या भागातील बीएलओंशी संपर्क साधावा किंवा डब्ल्यूूडब्यूडब्ल्यू.एनव्हीएसपी.इन या वेबसाइटवर जाऊन फॉर्म नंबर सहा भरावा. त्वरित नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, तहसीलदार वैशाली हिंगे यांनी केले आहे.