यशवंत पंचायत राज अभियानात जळगाव जि.प.तिसरी
By admin | Published: April 4, 2017 01:10 PM2017-04-04T13:10:38+5:302017-04-04T13:10:38+5:30
यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार योजनेत जळगाव जिल्हा परिषदेला तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे.
Next
17 लाखांचे बक्षीस : 13 रोजी पुरस्काराचे वितरण
जळगाव,दि.4- महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाकडून देण्यात येणा:या यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार योजनेत जळगाव जिल्हा परिषदेला तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. या संदर्भाच्या निर्णयाचे परिपत्रक जिल्हा परिषदेला सोमवारी प्राप्त झाल्याचे जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी दिली.
पंचायत राज प्रशासन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणा:या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना वर्षभरात केलेल्या कामाचे मुल्यमापन विचारात घेऊन विभागस्तर व राज्यस्तर अशा दोन स्तरावर हा पुरस्कार देण्यात येत असतो. राज्यातील उत्कृष्ट तीन जिल्हा परिषदा व तीन पंचायत समित्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. राज्यस्तरीय मुल्यांकन समितीची 17 मार्च रोजी झालेल्या बैठकीत राज्यस्तरीय पारितोषिक निवड समितीने राज्यस्तरीय पडताळणी समितीकडून प्राप्त झालेल्या अहवालावर अभ्यास करुन या पुरस्कारांची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये लातूर जिल्हा परिषदेने प्रथम, सोलापूर जि.प.ने व्दितीय तर जळगाव जि.प.ने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. जळगाव जि.प.ला 17 लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र या पुरस्काराच्या स्वरूपात मिळणार असून 13 एप्रिल रोजी मुंबईला या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.