जळगाव जिल्ह्यात पावसाची उघडीप, गाठली पासष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:09 PM2019-08-11T12:09:06+5:302019-08-11T12:09:28+5:30

जनजीवन पूर्वपदावर

Jalgaon district received rains in the open | जळगाव जिल्ह्यात पावसाची उघडीप, गाठली पासष्टी

जळगाव जिल्ह्यात पावसाची उघडीप, गाठली पासष्टी

Next

जळगाव : शनिवारी सकाळी पावसाने उघडीप दिली खरी मात्र दुपारी चार वाजता काही काळ पाऊस झाल्याने शहरवासीयांनी शनिवारी श्रावण महिन्यातील ऊन सावली आणि पावासाचा खेळ अनुभवला़ पावसाने उसंत घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर आले होते़ शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली असून पावसाने पासष्टी गाठली आहे़
शुक्रवारी जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती़ शुक्रवारी सायंकाळी पाऊस थांबला होता़ शनिवारी सकाळी आठवडाभरानंतर सूर्य दर्शन झाले़ मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण, नंतर ऊन व पुन्हा पाऊस व पुन्हा ऊन असा श्रावण शनिवारी अनुभवायला मिळाला़ शुक्रवारी यावल सर्वाधिक २९ मि.मी. पावसाची नोंद झाली़
धरणांच्या साठ्यात झपाट्याने वाढ
शुक्रवारी झालेल्या पावसामुळे जिल्हाभरातील धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे़ तीन मध्यम प्रकल्पांनी शंभरी गाठली आहे़ पाच प्रकल्पांमध्ये मात्र अद्यापही ठणठणात आहे़ यात मोठे प्रकल्प हतनूर २९़ ७३, गिरणा ६६़१३, वाघूर ३६़८३ टक्के भरले आहे़
तीन तालुके तहानलेले
चाळीसगावात सर्वात कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे़ चाळीसगाव तालुक्यात ४९़ ८ टक्के तर पाचोरा व भडगाव तालुक्यात अनुक्रमे ५९़२ व ५३़८ टक्के पावसाची नोंद झाली आहे़
गिरणा धरणाची कधी कदम ताल, कधी तेज चाल
खेडगाव, ता-भडगाव- गिरणा धरणाच्या वरील चणकापूर, पुनद, हरणबारी व केळझर धरणातील विसर्ग सहा हजार क्युसेक वरुन वाढत अठरा हजार इतका झाला, यामुळे शुक्रवार संध्याकाळपासुन धरणाच्या जलसाठ्याच्या टक्के वारीत झपाट्याने वाढ झाली आहे. गिरणा धरणातील पाणीसाठा ६१.४२ टक्क्यांवरुन शुक्रवारी रात्री तब्बल पाच टक्के तर शनिवारी दिवसा तीन टक्के वाढ होत ते संध्याकाळी ६८.५६ टक्के इतका झाला होता.गिरणा धरणात ७, ८ व ९ तारखेला वरील धरणातून होणारा विसर्ग कमी झाला होता. यामुळे तीन दिवसात जलसाठ्यात फक्त ६ टक्के इतकी वाढ झाली. पुन्हा शुक्रवारी संध्याकाळी धरणात वाढ झाल्याची माहिती अभियंता हेमंत पाटील व एस.आर.पाटील यांनी दिली आहे.
मुर्दापूर धरणात ९० टक्के जलसाठा
नशिराबाद - गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व धानवड पिंपळे धरणातील विसगार्मुळे नशिराबादनजीकच्या मुदार्पुर धरणात पाण्याचा जलसाठा मोठ्या वेगाने वाढत आहे. शनिवारी सुमारे ९० टक्के धरण भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आदिती कुलकर्णी व शाखा अभियंता आर. डी. राणे यांनी ‘लोकमत’ला दिली. जलसाठा वाढ झाल्यामुळे परिसरातील शेतकरी व नशिराबादकरांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा कमी होण्यास मदत होणार आहे. महामार्ग चौपदरीकरण व रेल्वे लाईनच्या कामासाठी लागणारा मुरूम या धरणातून काढण्यात आला. त्यासाठी युद्धपातळीवर धरणातील मुरूम खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे निर्धारित जलसाठा पेक्षा यंदा सुमारे दीड ते दोन लाख घनमीटर जलसाठा वाढला आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.यंदा तप्त उन्हामुळे धरणातील जलसाठा मोठ्या प्रमाणावर कमी झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून असलेल्या संततधार पावसाने व धानवड पिंपळे धरणातील विसर्ग मुदार्पुर धरणात झाल्यामुळे यंदा जलसाठा मोठ्या वेगाने वाढला आहे. गेल्या आठवड्यापूर्वी सुमारे ४० टक्के, त्यानंतर ६० टक्के आणि शनिवारी सुमारे ९० टक्के जलसाठा पूर्ण झाला आहे.
बारा तालुक्यांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस
जुलै अखेरपासून पावसाने जोर पकडला होता तो श्रावण महिन्याच्या सुरूवातीपासून कायम आहे़ गेल्या वर्षीच्या दुप्पट पाऊस यावर्षी झाला आहे़ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे़ त्यात सर्वाधिक मुक्ताईनगर ७७़ ५ टक्के, यावल ७५़५ टक्के, जामनेर ७४़३ टक्के, भुसावळ ७१़ ८, रावेर ७०़१, एरंडोल ६९़१, धरणगाव ६६़७, चोपडा ६५़९, जळगाव ६५़ ४, बोदवड ६५, अमळनेर ६३़६, पारोळा ६० अशी बारा तालुक्यातील पावसाची नोंद आहे़

Web Title: Jalgaon district received rains in the open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव