जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी तीन लाचखोर ‘एसीबी’च्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 07:41 PM2018-03-19T19:41:32+5:302018-03-19T19:41:32+5:30
जिल्ह्यात सोमवारी लाचखोरीची हद्दच झाली. वेगवेगळ्या कारणासाठी लाच मागणाºया तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. पहिली कारवाई जळगावात तर दुसरी कारवाई खर्दे, ता.धरणगाव येथे झाली. तिघांविरुध्द अनुक्रमे जिल्हा पेठ व धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, १९ : जिल्ह्यात सोमवारी लाचखोरीची हद्दच झाली. वेगवेगळ्या कारणासाठी लाच मागणाºया तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. पहिली कारवाई जळगावात तर दुसरी कारवाई खर्दे, ता.धरणगाव येथे झाली. तिघांविरुध्द अनुक्रमे जिल्हा पेठ व धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आले
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात दुय्यम निबंधक कार्यालयाचा दप्तरबंद अरुण विठ्ठल पाटील (वय ५९) व त्याचा खासगी पंटर राजेंद्र तापीराम सोनवणे (वय ५६) या दोघांना दोन हजाराची तर खर्दे. ता.धरणगाव येथील ग्रामसेवक सतीश पाटील याला दोन हजाराची लाच घेतांना पकडण्यात आले.
जुने रेकॉर्ड काढण्यासाठी मागितली लाच
सावखेडा, ता.यावल येथील तक्रारदार यांच्या आजोबाच्या नावे असलेल्या मिळकतीच्या खरेदी खताच्या नोंदीच्या सांक्षाकित प्रती देण्यासाठी जिल्हा अभिलेख जतन कक्षाचे दप्तरबंद कर्मचारी अरुण पाटील यांनी शनिवारी २२ रुपयांची लाच मागितली होती. सोमवारी ही रक्कम देण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्याकडे तक्रार केली होती. पोलीस निरीक्षक निता कायटे यांनी तक्रारीची पडताळणी करुन सोमवारी दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अभिलेख जतन कक्षात सापळा लावला.
विहिर अनुदानाच्या धनादेशासाठी लाच
खर्दे, ता.धरणगाव येथे तक्रारदार यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिर मंजूर झालेल्या अनुदानाचा कुशलचा धनादेश मागितला असता ग्रामसेवक सतीश पाटील याने तक्रारदाराकडे अडीच हजाराची मागणी केली. तडजोडीअंती दोन हजार रुपये सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात देण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. उपअधीक्षक गोपाळ ठाकूर व सहका-यांनी खर्दे येथे सापळा रचून ग्रामसेवक पाटील याला दोन हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. दरम्यान, पाटील याच्याविरुध्द धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
कोट..
सरकारी कामासाठी लाच मागण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नागरिकांनी अशा अधिकारी व कर्मचाºयांची तक्रार देण्यासाठी पुढे यावे. त्यांची नावे गुप्त ठेवली जातील.
-गोपाळ ठाकूर,उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग