जळगाव जिल्ह्यात इशारा अतिवृष्टीचा अन् दोन दिवसांपासून केवळ रिपरिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:59 AM2018-07-11T11:59:40+5:302018-07-11T12:00:57+5:30
जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम
जळगाव : मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी जोरदार पाऊस होत असला तरी जिल्ह्यात पावसाने अद्यापही पाठ फिरविल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून केवळ रिपरिपच सुरू असल्याने बळीराजासह सर्वच चिंतातूर झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलेला असताना केवळ २० ते ३० मि.मी. पावसाची नोंद होत आहे.
जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात मुंबई, नागपूर, कोकण सह इतरत्रही जोरदार हजेरी लावणारा पाऊस तर हुलकावणी देतच आहे, सोबतच हवामानाचे अंदाजही चुकत असल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडत आहे. याचा प्रत्यय गेल्या तीन दिवसांपासून येत आहे. जिल्ह्यात ७ जुलैपासून दररोज अतिवृष्टीचा इशारा दिला जात आहे. जोरदार पाऊस होणार असल्याचा आनंद तर अतिवृष्टीने पिकांच्या नुकसानीची चिंता अशा व्दिधा मनस्थितीत बळीराजा होता. अतिवृष्टी तर दूरच जिल्ह्यात जोरदार पाऊसही झाला नाही.
अतिवृष्टीचा इशारा असताना प्रत्यक्षात झालेला पाऊस
जळगाव तालुक्यात ७ रोजी ० मि.मी. ९ रोजी १ मि.मी., १० रोजी ०.१ मि.मी., जामनेर तालुक्यात ७ रोजी १.५ मि.मी. ९ रोजी १७.८ मि.मी., १० रोजी ०.९ मि.मी., एरंडोल तालुक्यात ७ रोजी ० मि.मी. ९ रोजी ० मि.मी., १० रोजी ० मि.मी., धरणगाव तालुक्यात ७ रोजी ० मि.मी. ९ रोजी ० मि.मी., १० रोजी ० मि.मी., भुसावळ तालुक्यात ७ रोजी ०.५ मि.मी. ९ रोजी ५.८ मि.मी., १० रोजी २.२ मि.मी., यावलतालुक्यात ७ रोजी २.१ मि.मी. ९ रोजी २.६ मि.मी., १० रोजी ० मि.मी., रावेरतालुक्यात ७ रोजी १४.१ मि.मी. ९ रोजी ६.४ मि.मी., १० रोजी ९ मि.मी., मुक्ताईनगर तालुक्यात ७ रोजी ०.५ मि.मी. ९ रोजी ३१.० मि.मी., १० रोजी ११ मि.मी., बोदवड ०.३ तालुक्यात ७ रोजी ०.३ मि.मी. ९ रोजी ४९.७ मि.मी., १० रोजी २.७ मि.मी., पाचोरा तालुक्यात ७ रोजी ० मि.मी. ९ रोजी २.३ मि.मी., १० रोजी ० मि.मी., चाळीसगाव १.९ तालुक्यात ७ रोजी १.९ मि.मी. ९ रोजी ५.१ मि.मी., १० रोजी ० मि.मी., भडगाव तालुक्यात ७ रोजी ० मि.मी. ९ रोजी ६ मि.मी., १० रोजी ० मि.मी., अमळनेर तालुक्यात ७ रोजी ० मि.मी. ९ रोजी ० मि.मी., १० रोजी ०.१ मि.मी., पारोळा तालुक्यात ७ रोजी ० मि.मी. ९ रोजी २.२ मि.मी., १० रोजी ० मि.मी., चोपडा तालुक्यात ७ रोजी ० मि.मी. ९ रोजी ०.४ मि.मी., १० रोजी ०.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये तर अनेक तालुक्यांमध्ये पाऊसच नसल्याचे (शून्य मि.मी.) दिसून येते.