जळगाव जिल्ह्यात बँकांकडून कर्जमाफीची आकडेवारीच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:49 PM2018-02-27T12:49:40+5:302018-02-27T12:49:40+5:30

लपवाछपवी

In the Jalgaon district, there is no credit offset by banks | जळगाव जिल्ह्यात बँकांकडून कर्जमाफीची आकडेवारीच मिळेना

जळगाव जिल्ह्यात बँकांकडून कर्जमाफीची आकडेवारीच मिळेना

Next
ठळक मुद्देरिझर्व्ह बँकचे अधिकारीही अनभिज्ञ घोळामुळे शेतकरी कर्जमाफी हा आता चेष्टेचा विषय बनला

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २७ - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफी योजनेंतर्गत राष्टÑीयकृत व खाजगी बँकांनी दिलेल्या कर्जमाफीची आकडेवारी रिझव्ह बँक, लीड बँक अथवा जिल्हा प्रशासनाकडे देखील उपलब्ध नाही.
पत्रकार व राजकीय पक्षांना अशी माहिती पुरविण्याची गरज नसल्याचे देखील शासनाने लीड बँकेला लेखी कळविले आहे. त्यामुळे यात लपवाछपवी सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बँकांच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने ही बाब स्पष्ट झाली.
जिल्हाधिकाºयांच्या सूचनेवरून बँकांच्या प्रतिनिधींनी पत्रकारांना माहिती दिली. त्यात राष्टÑीयकृत बँकांकडून दिल्या जाणाºया कर्जमाफीची आकडेवारी ना रिझर्व्ह बँकेकडे उपलब्ध आहे, ना लीड बँकेकडे. सहकार विभाग व जिल्हाधिकाºयांकडे देखील ही आकडेवारी नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.
सातत्याने सुरू असलेल्या घोळामुळे शेतकरी कर्जमाफी हा आता चेष्टेचा विषय बनला आहे. त्यात शासनाने आता राहून गेलेल्या शेतकºयांना कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी नव्याने संधी देण्याची घोषणा करून गोंधळात भर घातली आहे. जिल्हा बँकांकडील कर्जमाफीच्या आकड्यांबाबतही माहिती न देण्याच्या सूचना देणाºया राज्य शासनाने राष्टÑीयकृत व खाजगी बँकांकडील कर्जमाफीची माहिती पत्रकार व राजकीय कार्यकर्त्यांना देण्याची गरज नसल्याचे लेखी आदेश काढले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: In the Jalgaon district, there is no credit offset by banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.