जळगाव जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.९४ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 12:26 PM2021-07-16T12:26:29+5:302021-07-16T12:26:47+5:30
जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात जळगाव जिल्ह्याचा ...
जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात जळगाव जिल्ह्याचा निकाल ९९.९४ टक्के इतका लागला असून परीक्षा न झालेला, वर्ग न भरलेला हा पहिलाच असा निकाल आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या विषाणूच्या दुस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पण, निकाला कसा लागणार याची सर्वांना उत्सुकता होती. विद्यार्थ्यांच्या मूल्यांकन पध्दतीने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याचा ९९.९४ टक्के निकाल लागला आहे.
५८ हजार २७९ विद्यार्थ्यांची नोंदणी
इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातून ५८ हजार २७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.या संपूर्ण विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून बोर्डाकडे पाठविण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीचं ही प्रक्रिया शाळांनी पूर्ण केली होती.
५८,२४९ उर्त्तीर्ण
एकूण ५८ हजार २७९ विद्यार्थ्यांपैकी ५८ हजार २४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ३० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.