‘बेटी बचाओ’ अभियानाने जळगाव जिल्ह्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:52 AM2019-09-11T11:52:48+5:302019-09-11T11:53:22+5:30

प्रबोधन व कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे फलित

Jalgaon district's glory with 'Beti Bachao' campaign | ‘बेटी बचाओ’ अभियानाने जळगाव जिल्ह्याचा गौरव

‘बेटी बचाओ’ अभियानाने जळगाव जिल्ह्याचा गौरव

Next

आनंद सुरवाडे
जळगाव : जिल्ह्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हे अभियान प्रभावीपणे राबविणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा नुकताच दिल्ली येथे गौरव करण्यात आला़ मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा संदेश अगदी तळागाळात रूजवून, या अभियानात प्रबोधन व कायद्यांची कडक अंमलबजावणीचे धोरण प्रशासनाने गेल्या पाच वर्षात राबविल्याने मुलींचा सन्मान वाढला आहे.
या अभियानात देशात जळगावने पाचवा क्रमांक पटकाविला़ यामुळे जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या कारकिर्दीत या अभियानाने गती पकडली होती़
पन्नास टक्के सोनोग्राफी सेंटर बंद
जिल्हाभरात प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान होणाºया ३५० सोनोग्राफी सेंटरवर धडक कारवाई केल्यानंतर यापैकी सध्या पन्नास टक्के सेंटर बंदावस्थेत आहेत़
यातील अनेक डॉक्टरवर गुन्हे दाखल असून ही केंद्रे सील करण्यात आली आहे़
जिल्हाभरात पीसीपीएनडीटी अ‍ॅक्टची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने गेल्या तीन वर्षात मोठ्याप्रमणावर अशा तपासणीला आळा बसला आहे़
या उपाययोजना ठरल्या प्रभावी
प्रथम मुलगी झालेल्या मातेचा आरोग्य विभागाने साडी चोळी देऊन सन्मान केला़
शाळा, महाविद्यालयात जनजागृती, कविता, बोर्ड, ग्रामपोषण आरोग्य समितीकडून महिलांच्या सभा घेऊन जनजागृती, पथनाट्यातून जनजागृती़
पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणीपहिले अपत्य मुलगी असलेल्या दाम्पत्यांवर दुसºया अपत्यादरम्यान ट्रॅकींग पद्धतीने वॉच ठेवण्याची विशेष मोहीम़
वीस आठवड्यात गर्भपात होणार नाही याची काळजी घेतली़ विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी
गुड्डा -गुड्डी बोर्ड ठरला प्रभावी, सर्व प्रशासकीय कार्यालये व सर्व आरोग्य केंद्रामध्ये हा डिजिटल बोर्ड लावण्यात आला़
आपण याची सुरुवात केली असली तर माझ्यानंतर आलेले जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर व डॉ. अविनाश ढाकणे यांनी आपण प्रज्वलित केलेली ही ज्योत पेटती ठेवली व मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत झाली. राजस्थानमध्ये मुलींच्या शिक्षणाबाबत अनेक अडचणी आहेत. त्यामुळे मलाही प्रशासकीय सेवेत येताना अडचणी आल्या. त्यावेळी मी मुलींचा जन्मदर वाढविणे व त्यांच्या शिक्षणासाठी कार्य करण्याचा निर्धार केला. जळगावला असताना २०१५मध्ये ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या उपक्रमाद्वारे संधी मिळाली व हे काम सुरू केले. या राष्ट्रीय पुरस्काराचे श्रेय सर्व जळगावकरांना आहे.
- रुबल अग्रवाल, तत्कालीन जिल्हाधिकारी.
सर्व आजी माजी अधिकारी व आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यासह मोठ्या प्रमाणात झालेली जनजागृती, योजनांची अंमलबजावणी व सोनाग्राफी सेंटरवरील धडक कारवाई, याबाबींमुळे जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला आहे़ पहिले अपत्य मुलगी झाल्यानंतर आपण त्या मातेचा सन्मान केला़ ग्रामपातळीवर मुलींचे, महिलांचे महत्त्व पटवून दिले़ शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती अभियान राबविले, सर्व आरोग्य केंद्रात गुड्डा गुड्डी हा डिजिटल बोर्ड लावला व यातून मोठी जागृती केली-
- डॉ़ दिलीप पोटोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी
लिंगभेद ही एक वाईट प्रवृत्ती समाजात आहे़ ती बदलण्यासाठी आपण प्रयत्न केले़ कला पथकाद्वारे गावातागावात जनजागृती केली़ महसूल, पोलीस व आरोग्य विभागाने संयुक्तरित्या अनेक सोनोग्राफीसेंटरवर धाडी टाकून ते सील केले़ डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले़ त्यामुळे लिंग चाचण्यांना आळा बसला़ त्यामुळे मुलींच जन्माचे प्रमाण वाढले़ आधि जिल्ह्यात सर्रासपणे लिंग तपासणी, गर्भपात करणे हे सुरू होते़ ते आता पूर्णत: बंद झाले असून मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे़
- डॉ़ एऩ एस़ चव्हाण,
जिल्हा शल्यचिकित्सक
मुलींसाठी सुरक्षित वातावरण व शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्यावर पालकांची चिंता मिटते़ सामाजिक प्रबोधनाचे वाढते प्रमाण व सोनोग्राफी सेंटरमध्ये चालणारे गैरप्रकार रोखल्याने आपला जिल्हा दृष्टचक्रातून बाहेर पडला आहे़ जळगाव जिल्ह्याने बेटी बचाओ आणि बेटी पढाओ या अभियानात एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे़ आम्ही २००९पासून या क्षेत्रात काम करत आहोत़ दहा वर्षात ही आकडेवारी वाढता वाढता वाढली आहे़ ही कामगिरी समाधानकारक आहे़
- वासंती दिघे, सामाजिक कार्यकर्त्या

Web Title: Jalgaon district's glory with 'Beti Bachao' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव