Jalgaon: ट्रे़डिंग इन्व्हेसमेंट’च्या नावाखाली डॉक्टरची साडे सात लाखांची फसवणूक

By विजय.सैतवाल | Published: February 6, 2024 11:50 AM2024-02-06T11:50:55+5:302024-02-06T11:52:05+5:30

Jalgaon News: शेअर बाजारातील गुंतवणकीतून वाढीव मोबदल्याचे अमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी डॉक्टरचीच ऑनलाईन फसवणूक केली आहे. यात डॉ. चंदरलाल प्रभुदास उदासी (७०, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) यांच्याकडून दोन अनोळखींनी वेळोवेळी सात लाख ४७ हजार ७३७ रुपये ऑनलाईन स्वीकारले.

Jalgaon: Doctor defrauded of seven and a half lakhs in the name of 'trading investment' | Jalgaon: ट्रे़डिंग इन्व्हेसमेंट’च्या नावाखाली डॉक्टरची साडे सात लाखांची फसवणूक

Jalgaon: ट्रे़डिंग इन्व्हेसमेंट’च्या नावाखाली डॉक्टरची साडे सात लाखांची फसवणूक

- विजयकुमार सैतवाल
जळगाव - शेअर बाजारातील गुंतवणकीतून वाढीव मोबदल्याचे अमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी डॉक्टरचीच ऑनलाईन फसवणूक केली आहे. यात डॉ. चंदरलाल प्रभुदास उदासी (७०, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) यांच्याकडून दोन अनोळखींनी वेळोवेळी सात लाख ४७ हजार ७३७ रुपये ऑनलाईन स्वीकारले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिंधी कॉलनीतील डॉ. उदासी हॉस्पिटलमधील डॉ. चंदरलाल उदासी यांच्याशी इक्षीत व समीर शर्मा नाव सांगणाऱ्या दोन जणांनी २८ डिसेंबर २०२३ ते ३ फेब्रुवारी दरम्यान संपर्क साधला. यात त्यांना ‘ट्रे़डिंग इन्व्हेसमेंट’च्या नावाखाली मोबदला देण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार डॉ. उदासी हे गुंतवणूक करत गेले. वेळोवेळी सात लाख ४७ हजार ७३७ रुपये गुंतवूनदेखील कोणताच मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने डॉ. उदासी यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील नावे सांगणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करत आहेत.

Web Title: Jalgaon: Doctor defrauded of seven and a half lakhs in the name of 'trading investment'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.