Jalgaon: राज्यात ‘ईडी’चे सरकार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

By चुडामण.बोरसे | Published: October 28, 2023 11:32 PM2023-10-28T23:32:33+5:302023-10-28T23:33:04+5:30

Nana Patole: राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दहा पटीने वाढल्या आहेत. आपला कोणीच वाली नाही, अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे. त्यामुळे राज्यातील सरकार हे ‘ईडी’ चे सरकार आहे.

Jalgaon: 'ED' government in the state, Congress state president Nana Patole's criticism | Jalgaon: राज्यात ‘ईडी’चे सरकार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

Jalgaon: राज्यात ‘ईडी’चे सरकार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

बोदवड (जि. जळगाव) : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दहा पटीने वाढल्या आहेत. आपला कोणीच वाली नाही, अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे. त्यामुळे राज्यातील सरकार हे ‘ईडी’ चे सरकार आहे. ‘ई’ म्हणजे एकनाथ शिंदे आणि ‘डी’ म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आहेत... अशी जोरदार टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

जनसंवाद यात्रेनिमित्त पटोले यांची शनिवारी सायंकाळी बोदवड येथील गांधी चौकात जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी भाजप सरकारवर जोरदार शब्दात टीका केली. ते म्हणाले की, केळी पीक विम्याबाबत सरकारची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. खात्यात पैसे येतील की नाही त्याची खात्री दिसत नाही. हे पैसे जमा न झाल्यास राज्यात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी माजी खासदार उल्हास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, दिलीपसिंग पाटील, प्रतिभा शिंदे, सुधीर पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Jalgaon: 'ED' government in the state, Congress state president Nana Patole's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.