Jalgaon: नांदगाव स्थानकातील ब्लॉकमुळे २९ आणि ३० मे रोजीच्या आठ रेल्वेगाड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 11:43 PM2023-05-27T23:43:54+5:302023-05-27T23:44:31+5:30
Jalgaon Railway Update: भुसावळ- मनमाड विभागातील नांदगाव स्थानकात रिमोल्डिंगच्या कामासाठी २९ व ३० मे रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील आठ रेल्वेगाड्या रद्द, तर पाच रेल्वेगाड्या अन्य मार्गांनी वळविण्यात येणार आहेत.
- नरेंद्र पाटील
जळगाव - भुसावळ- मनमाड विभागातील नांदगाव स्थानकात रिमोल्डिंगच्या कामासाठी २९ व ३० मे रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील आठ रेल्वेगाड्या रद्द, तर पाच रेल्वेगाड्या अन्य मार्गांनी वळविण्यात येणार आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
२९ मे रोजी भुसावळ - देवळाली एक्स्प्रेस, पुणे- भुसावळ एक्स्प्रेस, नागपूर- मुंबई एक्स्प्रेस.
३० मे रोजी भुसावळ- इगतपुरी पॅसेंजर, इगतपुरी- भुसावळ पॅसेंजर, मुंबई- नागपूर एक्स्प्रेस, देवळाली- भुसावळ एक्स्प्रेस, तसेच भुसावळ- पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्या
३० मे रोजी नांदेड- निजामुद्दीन एक्स्प्रेस ही गाडी अकोला-भुसावळमार्गे वळविण्यात आली आहे. ३० रोजी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस अकोला- भुसावळमार्गे जाईल. अमृतसर- नांदेड सचखंड एक्स्प्रेस ही अमृतसरहून २९ रोजी सुटणारी गाडी भुसावळ कॉर्ड लाइन, अकोलामार्गे जाईल.
२८ रोजी एर्नाकुलम - निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस एर्नाकुलम येथून रोहा, वसई, उधना, जळगावमार्गे जाईल, तसेच २९ रोजीची निजामुद्दीन- एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस जळगाव, उधना, वसई रोहामार्गे जाईल, असे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.