Jalgaon Election Results : भाजपाचा विकासाचा मुद्दा ठरला प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 03:31 PM2018-08-03T15:31:13+5:302018-08-03T20:27:46+5:30

सुरेशदादा जैन यांना धक्का

Jalgaon Election Results: BJP's development issue has become effective | Jalgaon Election Results : भाजपाचा विकासाचा मुद्दा ठरला प्रभावी

Jalgaon Election Results : भाजपाचा विकासाचा मुद्दा ठरला प्रभावी

googlenewsNext
ठळक मुद्देआयात उमेदवारांचे मिळाले बळ ..आता महाजन यांनी मतदारांचा विश्वास सार्थ ठरवावा

हितेंद्र काळुंखे
जळगाव : मनपा निवडणुकीत भाजपाने संयमी प्रचार करीत जळगावकरांना विकासाचे आश्वासन दिले. त्यामुळे शहरवासीयांनी शिवसेनेला नाकाराले व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाला गेल्या ३५ वर्षात मतदारांनी प्रथमच हादरा दिला.याविरुद्ध विकासाचे आश्वासन स्विकारुन भाजपाला भरघोस कौल देत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.
गेली ३५ वर्षे जळगावच्या पालिका तसेच महापलिकेत सुरेशदादा जैन यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. याच काळात आमदार म्हणूनही त्यांचे वर्चस्व होते. आमदारकी गमावल्यानंतर ही मनपा निवडणूक त्यांच्यासाठी राजकीय अस्तीत्वाची लढाई होती. तर गिरीश महाजन यांच्या भाजपाच्या जिल्ह्यातील नेतृत्वाला झळाळी देणारी होती.
मनपातील सत्ताधाऱ्यांवरील नाराजीचा झाला फायदा
मनपावर हुडको व इतर कर्जाचा डोंगर असल्याने उत्पन्नातील बहुतांश वाटा हा कर्ज फेडण्यातच जात होता. यामुळे विकास कामांसाठी पैसाच शिल्लक राहत नसल्याने गेल्या अनेक वर्षात विकास कामेच होवू शकली नाही. याचबरोबर मनपातील सत्ताधाºयांवर गैरव्यवहाराचा ठपका बसला. ही कारणे मतदारांमध्ये सत्ताधारी खाविआ (शिवसेना) बद्दल नाराजी निर्माण करणारी ठरली. या नाराज मतदारांना विकासाचे आश्वासन देत आपल्याकडे वळविण्यात भाजपाने यश मिळवले.
विकास न केल्यास ‘विधानसभे’त मते न मागण्याचा दिलाय शब्द
मनपाला कर्जकमुक्त करु, विकासासाठी २ महिन्यातच २०० कोटी आणू आदी आश्वासने महाजन यांनी मतदारांना दिली. ही आश्वासने १ वर्षात पूर्ण नाही झालीत तर विधानसभेत मत मागणार नाही, असे म्हणत आमदार सुरेश भोळे यांना कसोटीवर लावले होते. हाच मुद्दा मतदारांना अपील करणारा ठरला. फक्त विकास करु असे म्हटले असते तर मतदारांनी कदाचित विश्वास टाकला नसता.
..आता महाजन यांनी मतदारांचा विश्वास सार्थ ठरवावा
नगरपालिका आणि मनपाच्या इतिहासात भाजपाला जळगावकरांनी प्रथमच मनपावर एकहाती सत्ता देवून विश्वास टाकला आहे. यामुळे भाजपाचा हा ऐतिहासिकच विजय ठरतो. विकास करु या आश्वासनावर विश्वास ठेवत मतदारांनी भाजपाला कौल दिला. यामुळे १ वर्षात विकास करुन दाखवू , एकदा संधी देवून बघा.... असे म्हणणारे गिरीश महाजन यांना मतदारांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी आता निभवावी लागणार आहे.

आयात उमेदवारांचे मिळाले बळ 
निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने मनसे, शिवसेना तसेच राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात प्रबळ उमेदवार आयात केले. याचाही लाभ भाजपाल झाला. स्वपक्षाचे १५ नगरसेवक होते. यापैकी १३ जणांना उमेदवारी देण्यात आली तर आयात उमेदवारांवर मदार ठेवत खाविआचे ३, राष्ट्रवादीचे ६ तर मनसेचे महापौर ललित कोल्हे यांच्यासह ६ व १ जनक्रांतीचा अशा एकूण १६ आयात केलेल्या नगरसेवकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना भाजपाने उमेदवारी दिली. शिवसनेसोबत असलेले मनसेचे महापौर व त्यांचे ८ नगरसेवक ऐन निवडणूकीत भाजपात शिरल्याने शिवसेनेला हा मोठा फटका बसला. महापौर ललित कोल्हे यांच्यासह इतर नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यात भाजपाची राज्यातील ‘सत्ता’ हेच प्रभावी अस्त्र ठरले.
 

Web Title: Jalgaon Election Results: BJP's development issue has become effective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.