जळगावात जिल्हा रुग्णालयात काम बंद, कर्मचाऱ्याच्या विक्षीप्तपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:55 PM2018-03-20T12:55:54+5:302018-03-20T12:59:05+5:30

चौकशी समिती गठीत

In Jalgaon the employee's staff of negligence 'Elgar' stopped working in the district hospital | जळगावात जिल्हा रुग्णालयात काम बंद, कर्मचाऱ्याच्या विक्षीप्तपणा

जळगावात जिल्हा रुग्णालयात काम बंद, कर्मचाऱ्याच्या विक्षीप्तपणा

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला परिचारिकेला जातीवाचक संदेशअहवाल सादर करण्याचे आदेश

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. 20 - महिला परिचारिकांशी अश्लिल व लज्जा वाटेल असे वर्तन करणे, अर्वाच्च भाषा वापरणे, दादागिरी करणे व गुन्हेगारी वृत्तीने वागणाºया रवींद्र देवराम पवार या कर्मचाºयाच्याविरोधात जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिकांनी एल्गार पुकारला आहे. या कर्मचाºयाची बदली होत नाही, तोपर्यंत काम न करण्याचा पवित्रा घेऊन या सर्व कर्मचाºयांनी सोमवाारी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रारी केल्या.
याबाबत परिचारिकांनी दिलेली माहिती अशी की, रवींद्र पवार हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी (शिपाई) आहे. त्याच्याकडे वर्ग-३ च्या कर्मचाºयाचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातील परिचारिकांकडून तो बिलाची वसूली करतो. हे बील त्याने वॉर्डात जाऊन घेणे अपेक्षित आहे. संपूर्ण महाराष्टÑात हीच पध्दत असताना येथे मात्र त्याला छेद देण्यात आला आहे. पवार हा गुन्हेगारी वृत्तीचा असून माझे कोणीच काही करु शकत नाही असे सांगून तो महिला कर्मचाºयांशी अरेरावी करतो, अशी तक्रार सार्वजनिक परिचारिका संघटनेच्या राज्य कोषाध्यक्ष सुरेखा लष्करे व सविता अग्नीहोत्री यांनी केली आहे. या कर्मचाºयावर कारवाई व्हावी म्हणून त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रारी करुनही प्रशासन त्यावर कारवाई करीत नसल्याचा आरोप परिचारिकांनी केला.
महिला परिचारिकेला जातीवाचक संदेश
सविता अग्निहोत्री या महिला परिचारिकेला पवार याने जातीवाचक संदेश पाठविला आहे. याआधी देखील त्यांने विकृतपणा केला, मात्र त्याकडे आम्ही दुर्लक्ष केले होते. आता मात्र त्याने परिसिमा ओलांडली आहे. पवार याच्याविरुध्द सुरेखा लष्करे, सविता अग्निहोत्री, छाया पाटील, जे.एम.बागुल, एन.एस.बालोद, रेखा धनगर, मालु वानखेडे, राणी बोराडे, आशा सिखलकर व आशा बारेला यांनी तक्रार केली आहे.
बारेला यांनी तर ४ आॅक्टोबर २०१७ रोजी पोलीस उपअधीक्षक व २० जानेवारी २०१८ रोजी अधीष्ठाता यांच्याकडे तक्रार केली आहे. लष्करे यांनीही ९ फेब्रुवारी २०१८ रोजी तर ६७ शिपायांनी पवार याचे मुकादम पद रद्द करण्याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
रवींद्र पवारची मुळ पदावर नियुक्ती; चौकशीसाठी समिती गठीत
रवींद्र पवार या कर्मचाºयावर कारवाईसाठी परिचारिकांनी घेतलेला आक्रमक पवित्रा व हिंदूत्ववादी संघटना देखील परिचारिकांच्या बाजूने उभ्या राहिल्याने वैद्यकिय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी तातडीने पवार याची मुळ शिपाई पदावर नियुक्ती केली. दरम्यान, प्रभारी अधिसेविका सविता अग्निहोत्री यांच्या तक्रारीची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधीक्षक डॉ.किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. चौकशी करुन २२ तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश डॉ.खैरे यांनी दिले आहेत. या समितीत डॉ.योगिता बाविस्कर व डॉ.निलेश देवराज यांचा समावेश आहे.

पवार याच्या विक्षिप्तपणाला महिला परिचारिका कंटाळल्या आहेत. महिलांशी अर्वाच्च भाषा व लज्जा वाटेल असे कृत्य त्याच्याकडून केले जाते. गुन्हेगारी वृत्तीच्या माणसाकडे आर्थिक व्यवहार देता येत नाही, तरीही प्रशासनाने त्याच्यावर जबाबदारी सोपविली आहे. प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे.
-सुरेखा लष्करे, राज्य कोषाध्यक्ष, सार्वजनिक परिचारिका संघटना

Web Title: In Jalgaon the employee's staff of negligence 'Elgar' stopped working in the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.