जळगावात सर्जा राजाचा साज मिळल्याने बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 03:00 PM2018-09-03T15:00:22+5:302018-09-03T15:08:03+5:30

पिकांची स्थिती बिकट असताना आपल्या सर्जा राजाचा पोळा सण कसा साजरा करावा या चिंतेत असतानाच पोळ््याचे साहित्य मिळाल्याने मोठा आधार मिळाला.

in Jalgaon farmar glad | जळगावात सर्जा राजाचा साज मिळल्याने बळीराजा सुखावला

जळगावात सर्जा राजाचा साज मिळल्याने बळीराजा सुखावला

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना पोळ््याचे साहित्य वाटपनेहरु चौक बहुउद्देशीय मित्र मंडळ व सुमेरु गांधी परिवाराचा उपक्रमशेतकºयांना मिळाला आधार

जळगाव : पिकांची स्थिती बिकट असताना आपल्या सर्जा राजाचा पोळा सण कसा साजरा करावा या चिंतेत असतानाच पोळ््याचे साहित्य मिळाल्याने मोठा आधार मिळाला. त्यामुळे वर्षभर आमच्या सोबत राबणाºया सर्जा राजास आम्ही किमान सजविणार, असे भावनिक उद्गार जिल्हाभरातून आलेल्या शेतकºयांनी येथे काढले.
श्री नेहरु चौक बहुउद्देशीय मित्र मंडळ व सुमेरु गांधी परिवारातर्फे रविवारी शेतकºयांना पोळ््याचे साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. या वेळी आमदार सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, मनपातील भाजपाचे गटनेते भगत बालाणी, बांधकाम व्यावसायिक श्रीकांत खटोड, श्री नेहरु चौक बहुउद्देशीय मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी, सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संजय गांधी यांनी केले.
आपल्या भाषणात मिलिंद कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे कौतूक करीत मंडळ व गांधी परिवाराने व्यापार व सामाजिक बांधिलकी जपल्याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. पोळा सणाला साहित्य मिळाल्याने आता प्रत्येक शेतकरी हा सण साजरा करू शकेल. या साहित्यामुळे शेतकºयास मोठा आधार मिळाल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी मनोगतातून नमूद केले. सूत्रसंचालन प्रकाश लोडते यांनी केले तर रिकेश गांधी यांनी आभार मानले. प्रवीण हिवरकर, गुलाब कोळी, बाळू पाटील, अमृत शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
१३० गरजूंना मदतीचा हात
पिकांची बिकट स्थिती, त्यात सरकारकडून मदत मिळत नाही, अशा स्थितीमुळे पोळा सण कसा साजरा होणार असा प्रश्न शेतकºयांसमोर पडला आहे. त्या मुळे अशा गरजू शेतकºयांनाही पोळा सण साजरा करता यावा यासाठी गावोगावी जीवून शेतकºयांची माहिती गोळा करण्यात आली व गरजू शेतकºयांची निवड करीत एकूण १३० शेतकºयांना मान्यवरांच्याहस्ते पोळ््याचे साहित्य वाटप करण्यात आले. गेल्या दीड महिन्यांपासून महेश ठाकूर, ललित अमोदेकर, पियूष गांधी यांनी गावा-गावात जावून सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका आदींकडून गरजू शेतकºयांची माहिती घेत ही निवड केल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. या साहित्यामध्ये दोर, नाथ, बोरखी, गोंडे, गेठे प्रत्येकी दोन व एक सुताची लट असे साहित्य वाटप करण्यात आले.

Web Title: in Jalgaon farmar glad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.