जळगावात लोक अदालतीत पाच हजार खटले निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 10:53 PM2018-02-10T22:53:48+5:302018-02-10T22:56:16+5:30

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या लोक अदालतीत शनिवारी ५ हजार २५१ खटले निकाली काढण्यात आले. त्यात तडजोडीअंती १८ कोटी ५८ लाख ५५ हजार १०३ रुपये वसुल करण्यात आले. तालुक्यातील सर्व न्यायालयात राष्टÑीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

In Jalgaon, five thousand cases were filed in the public court | जळगावात लोक अदालतीत पाच हजार खटले निकाली

जळगावात लोक अदालतीत पाच हजार खटले निकाली

Next
ठळक मुद्दे जिल्हा न्यायालय झाली लोकअदालत तडजोडीत १८ कोटी ५८ लाख वसुल भूसंपादनात व्याजात सूट

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१०  :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या लोक अदालतीत शनिवारी ५ हजार २५१ खटले निकाली काढण्यात आले. त्यात तडजोडीअंती १८ कोटी ५८ लाख ५५ हजार १०३ रुपये वसुल करण्यात आले. तालुक्यातील सर्व न्यायालयात राष्टÑीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा न्यायालयात झालेल्या या लोक अदालतीच्या अध्यक्षस्थानी विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे होत्या. प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे, वकील संघाचे सचिव अनिल पाटील, उपाध्यक्ष मिलिंद बडगुजर, जिल्हा सरकारी वकील व प्रांताधिकारी उपस्थित होते. यात १२ पॅनल नेमण्यात आले होते. प्रारंगी युनायटेड इंडिया या विमा कंपनीने न्या.बारणे यांच्याडे मोटार अपघात प्रकरणात ८ लाख ६४ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. तसेच दुसºया प्रकरणात ४३ लाख रुपयांची मोबदल्यात तडजोड झाली. विधवा महिलेचाही सौदा चिठ्ठीचा मालमत्तेवर हक्क सोडून दावा निकाली काढण्यात आला.
भूसंपादनात शेतकºयांकडून व्याजात सुट
भूसंपादनाच्या प्रकरणात शेतक-यांनी प्रलंबित प्रकरणे व दरखास्तीमध्ये सरकारला एक वर्ष व्याजात सूट दिली आहे.  याशिवाय रक्कम भरण्यास सरकारला एक वर्षाची मुदत दिली आहे. त्यामुळे अशा प्रकरणात ९ कोटी ७२ लाख ७४ हजार ५९३ रुपये तडजोड झाली. यात जलद व आव्हान न देता निकाल लागल्याने पक्षकार व सरकारचा फायदा झाला आहे.

Web Title: In Jalgaon, five thousand cases were filed in the public court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.