चालकाचा खून करुन लांबवलेली चारचाकी सापडली जळगावात

By Admin | Published: July 15, 2017 12:43 PM2017-07-15T12:43:04+5:302017-07-15T12:43:04+5:30

औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखा व सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवित गाडीचा छडा लावत

Jalgaon found out of driver's death | चालकाचा खून करुन लांबवलेली चारचाकी सापडली जळगावात

चालकाचा खून करुन लांबवलेली चारचाकी सापडली जळगावात

googlenewsNext
लाईन लोकमतजळगाव, दि. 15 - औरंगाबाद येथून चारचाकी भाडय़ाने करून औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील पालोद फाटय़ाजवळ धारदार शस्त्राने वाहन चालकाचा खून केला. त्यानंतर मृतदेह रस्त्यावर फेकत चारचाकी लांबविल्याची धक्कादायक घटना 14 रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडली़ औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखा व सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवित गाडीचा छडा लावत ही गाडी शुक्रवारी सायंकाळी जळगावातून ताब्यात घेतली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथील इमरान खान समंदर खान यांच्या मालकीची चारचाकी( एम़एच 19 ई़ई़ 3481) ही गाडी आह़े त्यावर चालक म्हणून शेख शकील शेख शब्बीर (वय-32, रा़नाटेगाव़जि़ औरंगाबाद) कामाला आह़ेशेगावसाठी भाडय़ाने केली गाडीऔरंगाबाद-शेगावसाठी भाडय़ाने नेहरु चौकात सापडली चारचाकीमोबाईल लोकेशननुसार आरोपींच्या पाठलाग करीत पोलिसांना गाडी जळगावातील नेहरु चौकात असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार शुक्रवारी दुपारी 4़10 वाजेच्या सुमारास सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर शिंदे, गुन्हे शोध पथकातील विष्णु पल्हाड, विलास सोनवणे, औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे संजय काळे हे पाचही कर्मचारी खाजगी वाहनातून (एम़एच़20 डी़ज़े4133) जळगावात दाखल झाल़े तपासचक्रे फिरवित अवघ्या बारा तासात पोलिसांनी चोरीच्या गाडीचा छडा लावला़नियंत्रण कक्षातून प्रतिसाद न मिळाल्याने नाराजीयादरम्यान जळगाव नियंत्रण कक्षाला फोन केला मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पोलीस गाडी घेवून औरंगबादकडे जाण्यासाठी निघाल़े तेवढय़ात शहर पोलीस ठाण्यातील दुष्यंत खैरनार घटनास्थळी आल़े त्यांनी पोलिसांकडून प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न केला़ शहर पोलीस ठाण्यात येण्याबाबत सांगितल़े यावेळी खैरनार यांच्याजवळ सिल्लोड पोलिसांनी नियंत्रण कक्षातून दोन तास फोनकरूनही प्रतिसाद मिळाल्याची नाराजी व्यक्त केली़ चोरीचे वाहन औरंगाबादच्या दिशेने रवाना केल़े यानंतर शहर पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीत नोंद करत कर्मचारी रवाना झाल़े

Web Title: Jalgaon found out of driver's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.