Jalgaon: गिरणा धरणाची सलग चौथ्या वर्षी शंभरी, ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

By Ajay.patil | Published: September 15, 2022 01:16 PM2022-09-15T13:16:27+5:302022-09-15T13:17:04+5:30

Girana Dam: ​​​​​​​जळगाव जिल्ह्यातील ६ तालुक्यांची सिंचनाची व पाण्याची तहान भागविणारे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी देखील १०० टक्के भरले असल्याने जिल्ह्यातील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांसाठी मिटला आहे

Jalgaon: Girana Dam overflow for the fourth consecutive year | Jalgaon: गिरणा धरणाची सलग चौथ्या वर्षी शंभरी, ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

Jalgaon: गिरणा धरणाची सलग चौथ्या वर्षी शंभरी, ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

Next

- अजय पाटील
जळगाव -  जिल्ह्यातील ६ तालुक्यांची सिंचनाची व पाण्याची तहान भागविणारे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी देखील १०० टक्के भरले असल्याने जिल्ह्यातील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांसाठी मिटला आहे. २०१९ पासून गिरणा धरण सलग चार १०० टक्के भरले असून, धरणाची बांधकाम पुर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच सलग चार वर्ष या धरणात १०० टक्के जलसाठा राहणार आहे. धरण तयार झाल्यानंतर ते आतापर्यंतच्या ५३ वर्षात हे धरण केवळ १२ वेळा १०० टक्के भरले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठ्या धरणांपैकी एक असलेले व जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातील जलसाठ्याने जुलै महिन्यातच नव्वदी गाठली होती. गिरणा धरणाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच गिरणा धरण जुलै महिन्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरले होते. धरण १०० टक्के भरले असल्याने गिरणेतून दोन दरवाज्यातून २ हजार ४४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून, धरणातील जलसाठ्यात आवक वाढल्यास धरणातून अजून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत पाटील यांनी दिली आहे.

गिरणा धरणाची माहिती
- १९५५ मध्ये गिरणा धरणाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली.
- सलग १४ वर्ष काम झाल्यानंतर १९६९ मध्ये या धरणाचे लोकार्पण करण्यात आले.
- १९७३ मध्ये गिरणा धरणात पहिल्यांदाच जलसंपन्न झाले.
- ५३ वर्षात गिरणा धरण केवळ १२ वेळा १०० टक्के भरले आहे.
- या प्रकल्पासाठी १३ कोटी रुपयांचा खर्च आला होता.

या वर्षांमध्ये धरण भरले १०० टक्के
१९७३ मध्ये हे धरण पहिल्यांदाच जलसंपन्न झाल्यानंतर १९७६ मध्ये पहिल्यांदाच १०० टक्के भरले होते. त्यानंतर १९८०, १९९४, २००४ ते २००७ सलग १०० टक्के भरले. त्यानंतर २०१९ पासून ते यंदापर्यंत हे धरण १०० टक्के भरत आले आहे.

हे सहा तालुके गिरणेवर अवलंबून
१. जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, पाचोरा, धरणगाव व जळगाव या तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न गिरणेमुळे सुटतो.
२. गिरणा धरणाची साठवण क्षमता २१ हजार ५०० दशलक्ष घनफुट असून, यातील जिवंत पाणीसाठा वगळून ३ हजार दशलक्ष घनफुट मृत साठा आहे.
३. गिरणा धरणात चणकापूर, पुनद या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असतो.

Web Title: Jalgaon: Girana Dam overflow for the fourth consecutive year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव