Jalgaon: बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

By अमित महाबळ | Published: January 1, 2024 05:49 PM2024-01-01T17:49:57+5:302024-01-01T17:50:50+5:30

Jalgaon News: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात (अन्वेषण) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण व एक कांस्यपदक प्राप्त केले.

Jalgaon: Gold medal for research students of Bahinabai Chaudhary University | Jalgaon: बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

Jalgaon: बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

- अमित महाबळ
जळगाव - शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात (अन्वेषण) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण व एक कांस्यपदक प्राप्त केले.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे २८ व २९ डिसेंबर २०२३ या कालावधीत पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठीय संशोधन महोत्सव पार पडला. दोन दिवसीय चाललेल्या या संशोधन स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातील १६ विद्यापीठे सहभागी झाली होती. विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून संधी उपलब्ध करून देणे हा महोत्सवाचा हेतू आहे.

या स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सोपान नांगरे यांनी औषधनिर्माण शास्त्र गटातून सुवर्ण पदक प्राप्त केले, तर तेजस पाटील याने आंतरविद्याशाखीय संशोधन गटात कास्य पदक प्राप्त केले. विद्यापीठाच्या या यशाबद्दल कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील आदींनी कौतुक केले. या स्पर्धेत संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. अमरदीप पाटील व डॉ. मनीषा देशमुख सहभागी होते. इतर गटात प्रदीप पाटील, दीपश्री मालखेडे, अविनाश पाटील, हेमांगी पाटील हे विद्यार्थीदेखील सहभागी होते. सोपान नांगरे व तेजस पाटील हे एच.आर. पटेल औषधीनिर्माण शास्त्र महाविद्यालयात आहेत.

Web Title: Jalgaon: Gold medal for research students of Bahinabai Chaudhary University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.